---Advertisement---

‘पोलार्ड, रसेल अन् पूरन असूनही संघाने गमावला सामना!’ कमी धावसंख्येचा पाठलाग करण्यास फेल ठरले दिग्गज

On: रविवार, सप्टेंबर 11, 2022 4:20 PM
Kieron-Pollard
---Advertisement---

कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) मध्ये शनिवारी एकूण 2 सामने खेळले गेले. पहिल्या सामन्यात जमैका तल्लावाहने त्रिनबागो नाईट रायडर्सचा 34 धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात गयाना ऍमेझॉन वॉरियर्सने सेंट लुसिया किंग्सचा 6 गडी राखून पराभव केला.

पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर जमैका तलावा संघाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 153 धावा केल्या. संघाची टॉप ऑर्डर फ्लॉप झाली असली तरी मधल्या फळीत कर्णधार रोव्हमन पॉवेलने जबरदस्त खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना त्रिनबागोची फलंदाजी अत्यंत खराब झाली. सुनील नरेन खाते न उघडताच बाद झाला. कॉलिन मुनरोने निश्चितपणे 29 धावा केल्या. मात्र, त्यानंतर निकोलस पूरन 13, आंद्रे रसेल 17 आणि किरॉन पोलार्ड अवघ्या 6 धावा करून बाद झाले. त्यामुळेच संघाला 20 षटकांत 8 गडी बाद 119 धावांपर्यंतच मजल मारता आली. आणि सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकासाठी माजी दिग्गजाने निवडला भारतीय संघ! आशिया चषकात नसलेल्या ‘या’ खेळाडूंना दिलंय स्थान
आशिया चषकातील खराब कामगिरीनंतर जॉन्टी रोड्सचा भारतीय संघाला विशेष सल्ला! म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---