आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) व्यस्त वेळापत्रकातील वेळ वाचवण्याच्या दृष्टीने 2023 पासून सुरु होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशिपमधील सामने 4 दिवसीय करण्याचा विचार करीत आहे. यावर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) रविवारी आयसीसीच्या या कल्पनेला विरोध केला आहे.
त्याचबरोबर, पाँटिंगने आपण आयसीसीच्या या कल्पनेशी सहमत नसल्याचेही सांगितले आहे.
“मी आयसीसीच्या या कल्पनेच्या विरोधात आहे. परंतु, मला हे जाणून घ्यायचे आहे की ज्या लोकांच्या मनात हा विचार आला तेव्हा याच्या मागे काेणते कारण आहे,” असे Cricket.com.auशी बोलताना पाँटिंग म्हणाला.
त्याचबरोबर पाँटिंग म्हणाला की, 4 दिवसीय कसोटीमुळे अधिक सामने अनिर्णित होतील.
“मला माहिती आहे की मागील दोन वर्षांमध्ये आम्ही अनेक सामने 4 दिवसांमध्ये संपताना पाहिले आहे. परंतु, मी याकडे लक्ष दिले की मागील वर्षी किती सामने अनिर्णित राहिले. जर सर्वच सामने 4 दिवसीय असते तर जास्त कसोटी सामने अनिर्णत संपुष्टात आले असते,” असेही पाँटिंग यावेळी म्हणाला.
त्याचबरोबर यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, गौतम गंभीर, ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन (Tim Paine), ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath), नॅथन लायन (Nathon Lyon), तसेच दक्षिण आफ्रिकेच्या वर्नोन फिलँडर (Vernon Philander) यांनीही आयसीसीच्या 4 दिवसीय कसोटी सामन्यांच्या कल्पनेला विरोध दर्शविला होता.
जो विक्रम सचिनने भारतासाठी केला तोच विक्रम टेलरने न्यूझीलंडसाठी केला!
वाचा👉https://t.co/2tGbxUFMhj👈#म #मराठी #Cricket #AUSvNZ @RossLTaylor— Maha Sports (@Maha_Sports) January 6, 2020
सामना झाला नाही पण भारतीय जुगाडाची झाली सगळीकडेच चर्चा
वाचा👉https://t.co/nlqu4bDWqG👈@BCCI #म #मराठी #Cricket #INDvSL— Maha Sports (@Maha_Sports) January 6, 2020