पुणे। ऑल स्टार्स संघाने पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अखेरपर्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत वॉरियर्स संघावर दोन धावांनी मात करून विजयी सलामी दिली. वॉरियर्सने पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता.
पूना क्लब क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत ऑल स्टार्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित सहा षटकांत ४ बाद ४८ धावा केल्या. यात खलीद पारवानीने २४ धावा केल्या. यानंतर ऑल स्टार्सच्या संघाच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून वॉरियर्सला ६ बाद ४६ धावांत रोखले. वॉरियर्सला अखेरच्या तीन चेंडूंत पाच धावांची गरज होती. मात्र, त्यांनी सलग तीन चेंडूंवर तीन फलंदाज गमावले. यातील दोघे धावबाद झाले. तत्पूर्वी, आरव विजने १५ चेंडूंत २६ धावा करून वॉरियर्सला चांगली सुरुवात मिळवून दिली होती. मात्र, इतरांना फटकेबाजी करण्यात अपयश आले.
संक्षिप्त धावफलक –
१) ऑल स्टार्स – ६ षटकांत ४ बाद ४८ (खलीद पारवानी २४, प्रकाश करिया १२, आरव विज २-५, रजत श्रॉफ १-११) वि. वि. वॉरियर्स – ६ षटकांत ६ बाद ४६ (आरव विज २६, झियान तलब १४, खलीद पारवानी २-३, प्रोमीत सूद १-१२, धवल गुंदेचा १-९).
२) टायगर्स – ६ षटकांत ७ बाद ३७ (अमेय कुलकर्णी २२, राजेश कासट २-५, झमीर २-७) पराभूत वि. सेलर्स – ६ षटकांत ३ बाद ४१ (सुमिरन मेहता १४, तारिक नाबाद ७, अमेय कुलकर्णी २-४).
३) टायफून – ६ षटकांत २ बाद ६७ (अश्विन शाह ३१, अमन पारेख २१, शरन सिंग १-११) वि. वि. जेट्स – ६ षटकांत ४ बाद ५६ (पुनीत सामंत नाबाद ३५, ऋषभ बजाज १२, अश्विन शाह १-८, अमित १-८). – सामनावीर आश्विन शाह
४) मावरिक्स – ६ षटकांत १ बाद ६४ (किरण देशमुख नाबाद ३४, रौनक सागर ढोले-पाटील २५, दिव्यांशू सेहगल १-७) पराभूत वि. किंग्ज – ५.३ षटकांत बिनबाद ६५ (आर्यमन पिल्लई नाबाद ३०, भार्गव पाठक नाबाद ३१). सामनावीर- आर्यमन पिल्लई
महत्त्वाच्या बातम्या –
छोटा पॅक बडा धमाका! तुम्हाला पार्थिव पटेलबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी माहितीये का?
पीटी शिक्षक ते जगातील एक नंबरचा गोलंदाज असा प्रवास करणारा सॅम्युअल बद्री
अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेलने खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात