पुणे। पुना क्लब गोल्फ कोर्सवर गेल्या रविवारी पार पडलेल्या २६व्या ग्रोव्हर वाईनयार्ड्स आंतरक्लब अजिंक्यपद स्पर्धेत इक्रम खानच्या नेतृत्वाखाली पुना क्लब गोल्फ कोर्स संघाने विक्रमी फरकाने अजिंक्यपदाचा मान पटकावला.
पुना क्लब गोल्फ कोर्स संघाने घरच्या मैदानावर खेळताना मुंबईच्या बॉंबे प्रेसिडेंसी क्लब संघाला अंतिम फेरीत पराभूत केले. मुंबईच्या युनायटेड सर्व्हिस क्लब संघाने तिसरा क्रमांक पटकवला. तर मुंबईचाच विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब संघाने चौथा क्रमांक मिळवला.
पुना क्लब गोल्फ संघाच्या अँड्र्यू पिंटो याने १४ गुणांचा हॅंडीकॅप घेऊन विजयी प्रारंभ करताना १३ हॅंडीकॅप असलेल्या युनायटेड सर्व्हिसेस क्लब मुंबई या संघाच्या संजय मायनी याचा २.५ गुणांनी सहज पराभव करताना आपल्या संघाला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. अँड्र्यू पिंटो यानेच स्पर्धेतील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरचा मान पटकावला.
निकाल:
विजेता: पुना क्लब गोल्फ कोर्स(४३.५ गुण);
उपविजेता: बॉंबे प्रेसिडेंसी क्लब(२८ गुण);
तिसरा क्रमांक: युनायटेड सर्व्हिसेस क्लब मुंबई(२१गुण);
चौथा क्रमांक: विलिंगडन स्पोर्ट्स क्लब मुंबई(१८.५गुण).
महत्त्वाच्या बातम्या –
विराटचा १०० व्या कसोटीत बीसीसीआय अध्यक्षांच्या विक्रमालाच धक्का, पाहा काय केलाय कारनामा
कोण आहे पाकिस्तानचा युवा सलामीवीर, ज्याने चक्क कमिन्सला फोडला घाम