बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्याबाबत शुक्रवारी (2 जानेवारी) एक धक्कादायक बातमी समोर आली. वयाच्या 32 व्या वर्षी अभिनेत्रीचे सर्वायकल कॅन्सरने निधन झाले, अशा बातम्या अचानक समोर आल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. पूनमचे बॉलिवूड पदार्पण ‘नशा’ या सिनेमातून झाले होते. पण जगाने तिचे नाव सर्वप्रथम 2011 वनडे विश्वचषकादरम्यान ऐकले होते.
आयसीसी वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका (IND vs SL) संघ आमने सामने होते. या सामन्यात भारतीय संघ जिंकला, तर न्यूड फोटोशूट करेल, अशी घोषणा पूनम पांडेकडून केली गेली होती. 12-13 वर्षापूर्वी असे बोल्ड वक्तव्य केल्याने पूनची सर्वत्र चर्चा झाली होती. इतकेच नाही, तर तिच्या घरच्यांशी देखील अभिनेत्रीचा वाद झाला होता.
वनडे विश्वचषक 2011चे यजमानपद भारताकडे होते. विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधी एक दिवस पूनम पांडे हिने एक वक्तव्य केले. याआधी असे बोल्ड वक्तव्य क्वचितच कुठल्या सिनेअभिनेत्रीने केले असावे. तिच्या म्हणण्याप्रामाणे भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेला मात दिली, तर ती स्वतःचे कपडे काढेल. तिच्या या धाडसी वक्तव्यानंतरच ती पहिल्यांदा सोशल मीडियावर चर्चेत आली.
पुढे भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर पूनमच्या घरी देखील चांगलाच वाद झाला. स्वतः अभिनेत्रीनेच याविषयी माहिती दिली होती. एका मुलाखतीत पूनम मांडे म्हणाली होती, “माज्या घरी ड्राम चालू आहे. माझी आई मला मारत आहे. माझे वडील चिंता करत आहेत की, मी हे काय करत आहे.” पण नंतर पूनमेही स्पष्ट केले की, तिचे हे विधान केवळ सर्वांचे लक्ष्य वेधण्यासाठी होते.
दरम्यान, आयसीसी वनडे विश्वचषक 2011 चा अंतिम सामना प्रत्येक क्रिकेटप्रेमी विसरू शकत नाही. एसएस धोनी या सामन्यात मॅच विनर ठरला होता. धोनीने शेवटच्या चेंडूवर मारलेला षटकार आजही चाहत्यांच्या अंगावर काटा आणणारा ठरतो. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 276 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 48.2 षटकात चार विकेट्सच्या नुकसानावर 277 धावा केल्या आणि विजय मिळवला. हा भारताचा दुसरा वनडे विश्वचषक विजय होता. पण त्यानंतर अद्याप एकही विश्वचषक जिंकता आला नाहीये.
महत्वाच्या बातम्या –
प्रतिक्षा संपली! देशांतर्गत क्रिकेटच्या हिरोला भारताकडून पदार्पणाची संधी, महत्वाचा गोलंदाज संघातून बाहेर
ENG vs IND । रोहित पुन्हा ठरला फुसका बॉम्ब! ‘या’ कारणास्तव धावा करण नाहीये कर्णधार