---Advertisement---

गरिबीमुळे क्रिकेटलाच सर्वस्व मानले, गमविण्यासारसे काहीही नव्हते!

On: सोमवार, ऑगस्ट 20, 2018 7:11 PM
---Advertisement---

जून महिन्यात श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाल्याने प्रकाश झोतात आलेल्या यशस्वी जयस्वालने कठीण परिस्थितीचा फायदा झाला असल्याचे म्हटले आहे.

16 वर्षीय यशस्वी हा पाणीपूरी विकत क्रिकेटची आवड जोपासत असताना त्याची ही निवड झाल्याने अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.

श्रीलंकेच्या या दौऱ्यात मुंबईच्या यशस्वीची सुरुवात चांगली झाली नव्हती. पहिल्या दोन सामन्यात 15 आणि 1 अशा धावा केल्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते. परंतू वनडे मालिकेतील शेवटच्या आणि निर्णायक सामन्यासाठी त्याची 11 जणांच्या संघात निवड झाली.

ही संधी मात्र न दवडता त्याने सलामीला खेळताना नाबाद 114 धावा केल्या. याबद्दल त्याने प्रशिक्षक डब्ल्यू व्ही रमण आणि संघ व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत. तसेच त्याने सांगितले की संघातून वगळले गेल्यानंतर सरावावर जास्त भर दिला.

याबरोबरच त्याच्या कठीण परिस्थितीविषयी तो म्हणाला, “कठीण परिस्थिती ही एकप्रकारे मला फायद्याचीच आहे. यामुळे माझ्याकडे हरण्यासारखे काहीच नव्हते. तसेच मी कष्ट करण्यास प्रोत्साहित झालो. कारण क्रिकेटशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता.”

“क्रिकेट हे माझे जीवन आहे आणि मला माहित आहे मी माझे लक्ष चांगल्या कामगिरीनेच गाठू शकतो.”

यश्वस्वीने त्याचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांच्याविषयी सांगितले की ” ज्वाला सर हे माझ्यासाठी सर्व काही आहेत. ते मला नेहमी प्रोत्साहित करतात आणि त्यांना माझ्याकडून सर्वोत्तमच हवे असते.”

“त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची माझ्यावर जबाबदारी आहे. ते माझे आदर्श आहेत कारण ते सुद्धा कठीण परिस्थितीतून पुढे आले आहेत. मला एकदिवस त्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करायची आहे. ”

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली वासिम जाफर हे यशस्वीचे आदर्श असून तो म्हणाला ‘इंडियन आॅइलसाठी जाफरसरांबरोबर खेळायला मिळाल्याने मी स्वत:ला नशिबवान समजतो.’ तसेच यशस्वीने यावर्षी रणजी खेळण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे.

19 वर्षांखालील भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यासाठीही उत्सुक असल्याचे यशस्वीने सांगितले. तो म्हणाला ‘माझा खेळ सुधारण्यासाठी त्यांच्याकडून सल्ले आणि मार्गदर्शन घेण्यास उत्सुक आहे. तसेच हे माझे स्वप्न आहे.’

श्रीलंका दौऱ्यावर जाण्याआधी यशस्वीला सचिन तेंडुलकरला घरी भेटण्याची संधी मिळाली होती. या 40 मिनिटाच्या भेटीत सचिनने यशस्वीला सल्ला दिला की, ‘पूर्णपणे खेळाकडे लक्ष दे आणि भूतकाळ किंवा भविष्याचा विचार करू नकोस.’

याबरोबरच 19 वर्षांखालील पुढील विश्वचषकाविषयी यशस्वी म्हणाला, “पुढील विश्वचषक अजून खूप दूर आहे. मी माझ्या कामगिरीने या स्तरापर्यंत पोहोचलो आहे. तसेच माझे काम हे मी खेळणार असलेल्या प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी आणि माझे सर्वोत्तम देण्याचे आहे.”

त्याचबरोबर त्याला भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी त्याचा 13 वर्षांचा असताना इंग्लंड दौऱ्यासाठी त्याला संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स कबड्डीत भारतीय पुरुष कबड्डी संघाचा निराशाजनक पराभव

एशियन गेम्स: लक्ष्यने मिळवून दिले भारताला दुसरे रौप्यपदक

एशियन गेम्स: नेमबाज दिपक कुमारला रौप्यपदक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment