---Advertisement---

RCB vs PBKS: फायनलमध्ये कशी असणार दोन्ही संघांची प्लेइंग 11? जाणून घ्या पिच रिपोर्टसहित सर्वकाही

On: सोमवार, जून 2, 2025 9:02 PM
---Advertisement---

RCB vs PBKS IPL Final 2025: आयपीएल 2025चा फायनल सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) संघात खेळला जाईल. त्यासाठी दोन्ही संघ मंगळवारी (3 जून) नरेंद्र मोदी स्टेडियमवर घाम गाळताना दिसतील. या दोन्ही संघांनी आतापर्यंत आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही, त्यामुळे 18 वर्षांच्या इतिहासात लीगला आठवा विजेता संघ मिळणार आहे. या सामन्यापूर्वी आपण दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन तसेच खेळपट्टीबद्दल (Pitch Report) जाणून घेऊयात. (Probable playing 11s for Punjab and Bangalore)

नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरली आहे. या मैदानावर क्वालिफायर-2 सामना खेळवण्यात आला होता, ज्यामध्ये एकूण 410 धावा झाल्या होत्या. आयपीएल 2025 मध्ये, या मैदानावर प्रथम फलंदाजी करणारा संघ फायद्यात राहिला आहे, कारण चालू हंगामात येथे खेळवलेल्या 8 सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी करणारा संघ 6 वेळा विजयी झाला आहे. या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा संघ पंजाब किंग्ज आहे, त्यांनी या वर्षी गुजरात टायटन्सविरुद्ध 243 धावा केल्या आहेत.

पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत 36 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये दोन्ही संघांनी 18-18 सामने जिंकले आहेत. आयपीएल 2025 मध्ये दोन्ही संघ तीन वेळा भिडले आहेत, त्यापैकी आरसीबीने 2 वेळा विजय मिळवला. गेल्या 6 सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, पंजाबला त्यापैकी फक्त 1 विजय मिळवता आला आहे. (RCB vs PBKS Head To Head Records)

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 (Probable playing 11s for Punjab and Bangalore)

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- विराट कोहली, फिल साल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड, सुयश शर्मा

पंजाब किंग्ज- प्रियांश आर्य, जोश इंग्लिस, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टाॅयनिस, शशांक सिंग, अझमतुल्ला उमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---