भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना आज निकाली ठरला. या सामन्यात भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवताना इंग्लंडवर एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला. भारताने या सामन्यात सांघिक कामगिरीचे उत्कृष्ट प्रदर्शन करताना इंग्लंडला कोणतीही संधी दिली नाही.
या विजयासह भारताने मालिका देखील ३-१ अशा फरकाने खिशात घातली. तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान पटकावण्यात देखील यश मिळवले. त्यामुळे सामन्यानंतर भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ जल्लोषामय वातावरणात हा विजय साजरा करत होते. याच क्षणांचा एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
विराटने उंचावली ट्रॉफी
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरणाची काही क्षणचित्रे आहेत. यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने मालिकेची ट्रॉफी उंचावल्याचा क्षण कैद करण्यात आला आहे. यात भारतीय कर्णधाराच्या चेहऱ्यावरील समाधान दिसून येत आहे. त्यानंतर कोहलीने संघाकडे ट्रॉफी सोपवत संपूर्ण संघासह छायाचित्र काढले आहे.
यात परंपरेप्रमाणे या मालिकेत पदार्पण करणारा युवा खेळाडू अक्षर पटेलकडे कोहलीने ट्रॉफी सोपवली. त्यानंतर अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराजने फोटोसाठी ट्रॉफी उंचावताच संपूर्ण संघाने एकच जल्लोष केला आहे. मालिकेच्या झळाळत्या ट्रॉफीवर ‘चँम्पियन्स’ ही अक्षरे झळकत असल्याचेही दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, रिषभ पंत, वाॅशिंग्टन सुंदर आणि विराट कोहली ट्रॉफीसह फोटो काढत असल्याचेही दिसते आहे.
C.H.A.M.P.I.O.N.S! 🏆 👏 🇮🇳#TeamIndia @Paytm #INDvENG pic.twitter.com/i4KWDxx2Ml
— BCCI (@BCCI) March 6, 2021
दरम्यान, या विजयाने भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. या सामन्यात भारत न्यूझीलंडच्या संघाशी दोन हात करेल. हा सामना आता जून महिन्यात १८ जून ते २२ जून दरम्यान लॉर्डसच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
अक्षर पटेलच्या सनग्लासेसची आनंद महिंद्रा यांना भूरळ! म्हणाले, त्यांचा ब्रँड काय आणि कुठे मिळतील?
विराट अँड कंपनीची भरारी! इंग्लंडवरील विजयाने जागतिक क्रमवारीत गाठले अव्वल स्थान
भारताच्या विजयाने साधला गेला योगायोगांचा चौफेर मेळ, पाहा काय ते