ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेला भारतीय संघ एकीकडे यजमान संघासोबत टी२० मालिकेत सामना करत आहे. दुसरीकडे मात्र, कसोटी संघाची तयारी सुरू आहे. भारत अ संघ ऑस्ट्रेलिया अ संघात सिडनी येथे ३ दिवसीय सराव सामना खेळला जात आहे. यादरम्यान सोमवारी (७ डिसेंबर) भारताचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनचा अफलातून झेल घेत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
झाले असे की, वेगवान गोलंदाज उमेश यादव आपल्या १५ व्या षटकातील शेवटचा चेंडू फेकत होता. यावेळी पेन ४४ धावांवर फलंदाजी करत होता. यादवने पेनला शेवटचा चेंडू बाऊंसर टाकला, यावर त्याने पुल शॉट मारला. यावेळी बॅकवर्ड स्केअर लेगवर शॉ क्षेत्ररक्षण करत होता. हा चेंडू त्याच्या हातापासून थोडा उंचावर होता. त्याने उडी घेत आपल्या उजव्या हाताने चेंडू झेलला.
झेल घेतल्यानंतर तो खाली कोसळला, परंतु त्याने झेल सोडला नाही.
हा चेंडू चौकाराच्या दिशेने जाणार की काय असे वाटत असताना शॉने हा झेल घेत उमेश यादवच्या खात्यात तिसरा विकेट जोडला. दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त होईपर्यंत ऑस्ट्रेलियाने ८ बाद २८६ धावा केल्या आहेत. त्यांनी ३९ धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात ९ विकेट्स गमावत २४७ धावा केल्या होत्या.
शॉने क्षेत्ररक्षणात कमाल दाखवली, परंतु फलंदाजीत त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. त्याला शून्य धावेवर तंबूत परतावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
Video – वाढदिवशी श्रेयस अय्यरने ठोकला तब्बल ‘इतक्या’ मीटरचा षटकार की विराटही झाला अचंबित
‘मी केले ते धोनी इतके वेगवान नव्हते’, सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाचे वक्तव्य; पाहा Video
पंड्याने गगनचुंबी षटकार ठोकत भारताच्या विजयावर केले शिक्कामोर्तब; पाहा भन्नाट Video