Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पावसामुळे भारत- न्यूझीलंडचे सराव सत्र रद्द, सामन्यातही मेघराजा घालणार विघ्न? जाणून घ्या मुंबईच्या हवामानाबद्दल

December 1, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/@ICC

Photo Courtesy: Twitter/@ICC


भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला. दोन्ही संघांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे हा सामना अनिर्णीत राहिला होता. तर दुसरा कसोटी सामना येत्या ३ डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ मुंबईत दाखल झाले आहेत. बुधवारी (१ डिसेंबर) या सामन्यासाठीचे सराव सत्र आयोजित करण्यात येणार होते. परंतु हे सत्र रद्द करण्यात आले आहे.

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ बुधवारी (१ डिसेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिल्या सराव सत्रासाठी मैदानात उतरणार होते. परंतु त्यांना हवामानाची साथ मिळाली नाही. मुंबईमध्ये जोरदार पावसाचे आगमन झाल्यामुळे हे सराव सत्र रद्द करण्यात आले आहे.

त्यामुळे आता हे दोन्ही संघ गुरुवारी (२ डिसेंबर) पुन्हा दुसऱ्या सराव सत्रासाठी मैदानात येणार आहे. परंतु हे सराव सत्र देखील रद्द होण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. यामागील कारण म्हणजे गुरुवारी मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता ८० टक्के आहे. हा सामना शुक्रवारी सुरू होणार आहे. आनंदाची बाब म्हणजे, या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी आहे.

तसेच पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेच्या हाती देण्यात आले होते. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातून विराट कोहली पुनरागमन करणार आहे. यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात प्लेइंग ईलेव्हन हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. कारण विराट कोहली संघात पुनरागमन करणार असल्याने कुठल्या खेळाडूला संघाबाहेर केले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तो श्रेयस अय्यरची जागा घेऊ शकतो असे म्हटले जाते आहे. परंतु आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने तुफानी शतक आणि अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे त्याने संघातील आपले स्थान जवळ जवळ निश्चित केले आहे.

View this post on Instagram

A post shared by BLACKCAPS (@blackcapsnz)

 

हा सामना पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने केवळ २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली आहे. वानखेडे स्टेडियममध्ये एका वेळी ३३ हजार प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात. परंतु नवीन नियमावलीनुसार फक्त ८ हजार प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेऊ शकतील. या सामन्यासाठीची तिकीट विक्री मंगळवारी (३० नोव्हेंबर) संध्याकाळी ४ वाजता सुरू झाली होती. तसेच काही मिनिटातच हे तिकीट सर्व विकले गेले.

महत्त्वाच्या बातम्या-

Video: हे चित्र आशादायी! देशाबाहेरील छावणीत अफगान मुले लुटतायेत क्रिकेटचा आनंद

केएल राहुलनंतर ‘या’ दिग्गजानेही सोडली पंजाब किंग्जची साथ, नव्या संघामध्ये दिसू शकतो नव्या भूमिकेत

पिंपरी-चिंचवडमधील ११ व्या हॉकी इंडिया वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद जेतेपदासाठी ३० राज्य संघांमध्ये होणार चुरस


Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

IPL Retention: व्यंकटेश, उमरानची किंमत थेट ४० टक्क्यांनी वाढली, तर 'या' १० खेळाडूंचाही गच्च भरला खिसा

अल्टिमेट कराटे लीगमध्ये पुणे डिव्हाईनचा संघ 'विनिंग किक' मारून विजेतेपद पटवण्यासाठी सज्ज

Photo Courtesy: Twitter/IPL

मुंबईचा अभिमान पोलार्ड तात्या! अवघ्या ६ कोटीत मान्य केले रिटेंशन

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143