---Advertisement---

दु:खद! ज्याने क्रिकेट जगताला दिला धोनीसारखा हिरा, त्यानेच घेतला जगाचा निरोप

On: बुधवार, जानेवारी 4, 2023 3:43 PM
MS-Dhoni
---Advertisement---

क्रिकेटमधून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याला मोठा धक्का बसला आहे. धोनीसारखा दिग्गज खेळाडू क्रिकेट जगताला देणाऱ्या आणि बीसीसीआयचे प्रतिभा पारखणारे (टॅलेंट स्पॉटर) प्रकाश पोद्दार यांचे निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालसाठी खेळणारे प्रकाश हे तेच व्यक्ती होते, ज्यांनी बीसीसीआयला एमएस धोनी याचे नाव यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सुचवले होते.

हाती आलेल्या वृत्तानुसार, बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी सांगितले की, मंगळवारी (दि. 03 जानेवारी) प्रकाश पोद्दार (Prakash Poddar) यांचे हैदराबाद येथे निधन झाले. प्रकाश यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल आणि राजस्थान या दोन्ही संघांचे प्रतिनिधित्व केले होते. ते हैदराबाद येथे राहायचे. तिथे त्यांनी 29 डिसेंबर रोजी शेवटचा श्वास घेतला. ते साठच्या दशकातील एक जबरदस्त फलंदाज होते. त्यांनी इंग्लंडविरुद्ध एका घरगुती मालिकेत भारतीय कसोटी संघात स्थान मिळवले होते. त्यांच्या नावावर 40पेक्षा कमी सरासरीने 11 प्रथम श्रेणी शतकांचा समावेश होता.

पोद्दार आणि बंगालचे त्यांचे माजी सहकारी राजू मुखर्जी यांनी बीसीसीआयच्या प्रतिभा आणि संशोधन विकास शाखेचे (TRDW) प्रमुख दिलीप वेंगसरकर यांना एमएस धोनी याच्या नावाची शिफारस करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. टीआरडीडब्ल्यूच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावणारे अनुभवी क्रीडा पत्रकार मकरंद वयंगंकर यांनी सांगितले की, “पीसी दा आणि राजू प्रतिभा आणि संशोधन विकास अधिकारी होते. तसेच, धोनी त्यावेळी जमशेदपूरमध्ये एका रणजी वनडेत बिहार (झारखंडला बीसीसीआयचा दर्जा मिळण्यापूर्वी) संघाकडून खेळत होता. त्या दोघांनीही त्याच्या खेळण्याची क्षमता पाहिली आणि दिलीप वेंगसरकर यांच्याकडे त्याच्या नावाची शिफारस केली.”

त्यांनी पुढे सांगितले की, “पीसी दा यांना वाटले की, अशाप्रकारचे जबरदस्त हात आणि डोळ्यांचा समतोल राखणारा खेळाडू इथेच खेळत राहील आणि त्यामुळे बीसीसीआयला त्याला पारखण्याची आणि तयार करण्याची गरज आहे. पुढे जे घडलं, तो इतिहास आहे.”

विशेष म्हणजे, ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ सिनेमात राष्ट्रीय निवडकर्ते किरण मोरे हे प्रकाश नावाच्या व्यक्तीसोबत बोलताना दिसले होते. ते षटकार मारणाऱ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुलाबद्दल बोलत होते. बंगालचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे सामना अधिकारी राजू यांनी त्यांच्या ब्लॉगवर पोद्दार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (prakash chandra poddar cricketer who first recommended former captain ms dhoni to bcci dies at the age of 82)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कधीकाळी क्रिकेटसाठी वडिलांच्या शिव्या खात मावी; द्रविडच्या ‘त्या’ शब्दांनी बदलले आयुष्य
सामनावीर दीपक हुडाने व्यक्त केली खंत, सांगितली टीम इंडियाची चूक!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---