---Advertisement---

बीसीसीआयने या खेळाडूला दिले नाही २ वर्षांपासुन वेतन; भाऊ आहे कोरोना पॉझिटिव्ह, तर आईलाही श्वसनाचा त्रास

On: शनिवार, मे 1, 2021 7:53 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था मानली जाते. पंरतु कोरोनाच्या या कठीण परिस्थितीत मात्र बीसीसीआयने आपल्या खेळाडुंना वेतन दिले नसल्याची बातमी समोर येत आहे. बिहारचा 21 वर्षीय वेगवान गोलंदाज प्रंशात सिंग याला मागील दोन सत्रांपासुन बीसीसीआयने वेतन दिलेले नाही. प्रशांतचा मोठा भाऊ कोरोना प्रादुर्भावाने संक्रमित असुन प्रशांत त्याच्या उपचाराच्या खर्चामुळे चिंतेत आहे. त्यासोबतच त्याच्या आईला देखील श्वसनाचा त्रास असल्याची माहिती समोर येत आहे.

२३ वर्षांखालील संघामध्ये खेळणारा प्रशांत हा कुटुंबातील एकमात्र कमावता व्यक्ती आहे. प्रशांत सोबतच बिहारच्या १९ वर्षांखालील, २३ वर्षांखालील आणि वरिष्ठ संघातील खेळाडूंना देखील मागील दोन सत्रातील वेतन मिळालेले नाही. प्रंशात सिंगच्या म्हणण्यानुसार त्याला 8 लाख रुपये मिळणार आहेत. मोबाईलवर कुठलाही मेसेज आल्यानंतर प्रशांतला त्याचे वेतन मिळाले असल्याची आशा जागते. प्रशांतने त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी कर्ज घेतलेले असून 2016 मध्ये त्याने आपल्या वडिलांना देखील गमावले आहे.

बिहार क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार वेतनाचे जे व्हाऊचर बीसीसीआयला पाठवले होते त्यामध्ये चुका झाल्या होत्या. बिहार क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष राकेश तिवारी यांच्या म्हणण्यानुसार व्हाऊचर्स पुन्हा एकदा बीसीसीआयला पाठवले गेले आहे. तर बीसीसीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की वेतन देण्याअगोदर त्यांना पुन्हा कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल. दरम्यान, राकेश तिवारी यांनी म्हटल्यानुसार लवकरच प्रशांतला त्याचे वेतन मिळावे हीच त्याच्या कुटुंबाची आशा असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

शाब्बास अजिंक्य…! कोरोनाच्या कठीण काळात महाराष्ट्रासाठी पुन्हा एकदा रहाणेने पुढे केला मदतीचा हात, वाचा पूर्ण माहिती

काहीदिवसांपूर्वी केलेले ‘ते’ ट्विट डिलिट करण्याचा ट्विटरकर्त्यांचा हरप्रीत ब्रारला सल्ला

आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विमानात किवींसह ऑस्ट्रेलियन खेळाडू पण येणार? ग्लेन मॅक्सवेलने काढलाय भन्नाट उपाय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---