भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात बुधवारी (०९ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे झालेला दुसरा वनडे सामना (Second ODI) भारतीय संघाने ४४ धावांनी जिंकला. हा सामना जिंकत रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने ३ सामन्यांची वनडे मालिकाही खिशात घातली आहे. भारतीय संघाच्या या दणदणीत विजयाचा सूत्रधार ठरला तो, वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna).
या युवा गोलंदाजाने या सामन्यात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आणि बलाढ्य वेस्ट इंडिजला केवळ १९३ धावांवरच रोखले. या भेदक गोलंदाजीसह त्याने मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
त्याचा हा वनडे कारकिर्दीतील केवळ सहावाच सामना होता. या सामन्यात त्याने ९ षटके गोलंदाजी करताना केवळ १२ धावा देत ४ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्यानेच भारतीय संघाला या सामन्यातील पहिली विकेटही मिळवून दिली होती. त्याच्या या बहुमुल्य योगदानासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
याबरोबरच ही कामगिरी करत तो सर्वात कमी धावा देत एकाच वनडे डावात ४ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा केवळ तिसराच भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे. त्याच्यापूर्वी फक्त भुवनेश्वर कुमार आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी हा पराक्रम केला होता.
भुवनेश्वरने २०१३ साली श्रीलंकेविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या वनडे सामन्यात फक्त ८ धावांवर ४ विकेट्स हॉल घेतला होता. तर या विक्रमांत स्टुअर्ट बिन्नी अव्वलस्थानी आहे. त्याने २०१४ मध्ये मिरपूर येथे बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यात फक्त ४ धावा देत ६ विकेट्स चटकावल्या होत्या.
वनडेमध्ये सर्वात कमी धावांवर ४+ विकेट्स घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज
६/४ स्टुअर्ट बिन्नी वि. बांगलादेश (मिरपूर, २०१४)
४/८ भुवनेश्वर कुमार वि. श्रीलंका (पोर्ट ऑफ स्पेन, २०१३)
४/१२ प्रसिद्ध कृष्णा वि. वेस्ट इंडिज (अहमदाबाद, २०२२) *
याखेरीज १२ धावांवर ४ विकेट्स ही कृष्णाच्या वनडे कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरीही ठरली आहे. त्याने आतापर्यंत भारताकडून ६ वनडे सामने खेळले असून यादरम्यान ९ च्या इकोनॉमी रेटने एकूण १५ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ज्यादा टेंशन नहीं लेने का! १८ धावांवर बाद होऊनही पंतभाऊ बिनधास्त बाउंड्रीवरच पडला आडवा- Photo
जॉर्ज ऑर्टिझची हॅटट्रिक, एफसी गोवानं मिळवला चेन्नईयनवर मोठा विजय!