---Advertisement---

गलती से मिस्टेक! ट्रेंट बोल्टच्या पायाला लागला प्रसिद्ध कृष्णाचा तेजतर्रार थ्रो, धापकन पडला खाली

On: मंगळवार, मे 3, 2022 12:43 PM
Prasidh-Krishna-Throw-Video
---Advertisement---

कोणत्याही क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडूंच्या प्रदर्शनाखेरीज बऱ्याचशा मजेशीर किंवा गंभीर गोष्टी घडताना दिसतात. असेच काहीसे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघादरम्यान घडले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना कोलकाताने ७ विकेट्स राखून जिंकला. या सामन्यादरम्यान चुकून राजस्थानकडून क्षेत्ररक्षण करत असलेल्या प्रसिद्ध कृष्णा याने वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याला चेंडू मारला, ज्यामुळे तो गंभीर जखमीही होऊ शकला असता. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

राजस्थानच्या १५३ धावांच्या (RR vs KKR) आव्हानाचा बचाव करत असताना तिसऱ्या षटकादरम्यान हा प्रसंग घडला. राजस्थानकडून बोल्ट (Trent Boult) हे षटक टाकत होता. कोलकाताकडून सलामीला ऍरॉन फिंच आणि बाबा इंद्रजित फलंदाजी करत होते. इंद्रजितने बोल्टच्या षटकातील एक चेंडू मिड ऑनवर मारला आणि एक धाव घेण्यासाठी पळाला. मिड ऑनवर कृष्णा (Prasidh Krishna) क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. त्याने पटकन चेंडू पकडला आणि वेगाने नॉन स्ट्राईककडे फेकला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

परंतु त्याच्या तेजतर्रार थ्रोच्या रस्त्यात बोल्ट आला. तो चेंडू इतक्या वेगाने आला की, बोल्टला स्वत:ला सांभाळण्यासाठी वेळही नाही. त्याने चेंडूपासून वाचण्यासाठी हवेत उंच उडीही मारली. परंतु चेंडू त्याच्या बूटांना लागून (Prasidh Krishna Throw On Leg Of Trent Boult) गेला. जर हा चेंडू चुकून त्याच्या पायाला लागला असता, तर त्याला गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. परंतु तसे झाले नाही. या प्रसंगानंतर बोल्ट हसतानाही दिसला. राजस्थानचा फिरकीपटू युझवेंद्र चहलला या प्रसंगाला पाहून हसू फुटले.

https://twitter.com/4sacinom/status/1521180203929776129?s=20&t=fxah-1vFMehS1EJ9ylWSQw

दरम्यान राजस्थानचे गोलंदाज या सामन्यात विशेष चमक दाखवू शकले नाही. ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप सेन यांनी मिळून सुरुवातीला संघाला मोठ्या विकेट्स मिळवून दिल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे कोलकाता संघ १३ षटकांमध्ये ९२ धावांवर ३ विकेट्स अशा स्थितीत होता. परंतु पुढे रिंकू सिंग आणि नितीश राणाची जोडी मात्र राजस्थानच्या गोलंदाजांना फोडता आली नाही. या दोघांनीही शेवटच्या षटकात खोऱ्याने धावा ओढल्या.

नितीश राणाने ३७ चेंडू खेळताना नाबाद ४८ धावा केल्या, तर रिंकू सिंगने २३ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या. परिणामी ५ चेंडू शिल्लक असताना कोलकाताने हा सामना जिंकला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

राजस्थानची रुळावरून घसरली गाडी, सलग दुसऱ्या पराभवानंतर कर्णधाराने सांगितली कुठे होतेय चूक?

राजस्थान रॉयल्सचा ‘हा’ धडाकेबाज फलंदाज म्हणतोय, ‘माझी पत्नीच माझी मोठी टीकाकार आणि कोच’

वडील करायचे सिलेंडर डिलेव्हरीचे काम, आता मुलगा आयपीएलमध्ये बनलाय केकेआरचा मॅच विनर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---