यावर्षी पहिल्यांदाच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली गेली. सांगलीमध्ये पार पडलेल्या या महिला कुस्ती स्पर्धेत प्रतीक्षा बागडी हिने बाजी मारली. मुळची सांगलीची असणारी प्रतीक्षा आता पहिली महाराष्ट्र केसही बनली आहे. अंतिम सामन्यात तिने कल्याणच्या वैष्णवी पाटील हिला चितपत केले. मानेवर एकेरी डाव टाकत प्रतीक्षाने ही लढत जिंकली आणि मानाची गदा नावावर केली.
१ ली महिला महाराष्ट्र केसरी – सांगली २०२२ प्रतीक्षा बागडी ( सांगली )
हार्दिक अभिनंदन
प्रा बाळासाहेब लांडगे
सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद pic.twitter.com/LTEPwdWfFJ— Maharashtra State Wrestling Association म.रा.कु.प. (@StateMswa) March 24, 2023
माझ्या मतदारसंघातील तुंग येथील महिला कुस्तीपटू पै. प्रतिक्षा रामदास बागडी यांनी आज कल्याणच्या पै. वैष्णवी पाटील यांना चितपट करीत पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावला. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐#MaharashtraKesari #sangli #महाराष्ट्र_केसरी pic.twitter.com/gYms59wQZV
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 24, 2023
पहिल्यांदाच आयोजित केल्या गेलेल्या महिला महाराष्ट्र केसही स्पर्धेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण 450 कुस्तीगिर महिला महाराष्ट्र केसरी बनण्याचे स्वप्न घेऊन सांगलीत दाखल झाल्या होत्या. पण गदेचा मान एकड्या प्रतीक्षालाच मिळाला. मिरज येथील जिल्हा कुस्ती संकुल याठिकाणी या स्पर्धा पार पडला. गुरुवारी (23 मार्च) हिंदकेसरी दीनानाथ सिंग यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. शुक्रविरा (24 मार्च) स्पर्धेची अंतिम लढत पार पडली.
(Pratiksha Bagdi become a First Women Maharashtra Kesari)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘जर मी त्या लेवलला पोहोचलो तर…’, आयपीएल सुरू होण्यापूर्वी विराटचे खास संकेत
Eliminator: नाणेफेक जिंकत यूपीचा गोलंदाजीचा निर्णय, मुंबई देणार फायनलसाठी झुंज