पुणे, 21 ऑगस्ट, 2023: कुंटे चेस अकादमी आणि मिलेनियम नॅशनल स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने व किंडर स्पोर्ट्स एलएलपी यांच्या सहकार्याने आयोजित मिलेनियम नॅशनल स्कुल व कुंटे चेस अकादमी पुरस्कृत विविध वयोगटातील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत प्रतिती खंडेलवाल, शर्विन बडवे, क्षितिज प्रसाद, राघव पावडे या खेळाडूंनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
मिलेनियम स्कुल, कर्वेरोड येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सातव्या फेरीत 14 वर्षाखालील गटात प्रतिती खंडेलवालने आरुश बडजादेचा पराभव 6.5 गुणांसह विजेतेपद पटकावले. 12 वर्षाखालील गटात शर्विन बडवेने सम्राज्ञी पाटीलचा पराभव करून 6.5गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. 10 वर्षाखालील गटात क्षितीज प्रसादने पीवाय इशान अर्जुनवर विजय मिळवत 6.5गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. प्रतिती खंडेलवाल, शर्विन बडवे, क्षितिज प्रसाद हे कुंटे चेस अकादमीत प्रशिक्षक मृणालिनी कुंटे यांच्या मार्गर्शनाखाली सराव करतात.
8 वर्षाखालील गटात राघव पावडेने निवान अगरवालचा पराभव करून 7गुणांसह विजेतेपद मिळविले. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे, मिलेनियम नॅशनल स्कूलचे संचालक अन्वित फाटक, स्पर्धा संचालिका मृणालिनी कुंटे, अभिमन्यु वकील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चीफ आरबीटर नितीन शेणवी, अभिषेक केळकर आणि विनिता श्रोत्री आदी मान्यवर उपस्थित होते. (Pratithi, Sharwin, Kshitij and Raghava win the open chess tournament sponsored by Millennium National School and Kunte Chess Academy)
स्पर्धेचा सविस्तर निकाल: सातवी फेरी:8 वर्षाखालील गट:
राघव पावडे(7गुण) वि.वि.निवान अगरवाल(5गुण);
साहिल सुतरवाला(5गुण)पराभुत वि.आयुश जगताप (6गुण);
शाळवे चास्कर (4.5गुण) पराभुत वि.तीर्थ कोद्रे (6गुण)
अर्जून कौलगुड (5.5गुण) वि.वि.अर्णव कांगो (4.5गुण);
आदित्य भंडारी (4गुण) पराभुत वि. विराट दोडके (5.5गुण);
10 वर्षाखालील गट:
कविश लिमये (6गुण)बरोबरी वि. रिजुल कुरडे (5.5गुण);
पीवाय इशान अर्जुन(5गुण) पराभुत वि.क्षितीज प्रसाद(6.5गुण);
तनिश गांगल (5.5गुण) वि.वि.रौनक कोरे(4.5गुण);
पारस शर्मा(5गुण) बरोबरी वि. मितांश देशमुख(5गुण);
विहान देशमुख(5गुण) वि.वि.रियान भोसले(4गुण);
12 वर्षाखालील गट:
सम्राज्ञी पाटील(5गुण) पराभुत वि.शर्विन बडवे (6.5गुण);
स्पर्श बात्रा (6गुण) वि.वि.सृजन बोरकर (5गुण);
ओजस देवगडे (5गुण)बरोबरी वि.अभिजय वाळवेकर (5.5गुण);
सई पाटील(4.5गुण) पराभुत वि.चतुर्थी परदेशी(5.5गुण);
कृष्णा वंदनापू(5गुण) वि.वि.हितान (4गुण);
14 वर्षाखालील गट:
प्रतिती खंडेलवाल (6.5गुण) वि.वि.आरुश बडजादे (5.5गुण);
हितांश जैन(5.5गुण) वि.वि. अनिक भट्टाचार्जी(5गुण);
अनय उपलेंचावर (5.5गुण) वि.वि.आदिती कुलकर्णी (5गुण);
ओजस रत्नावत (4गुण) पराभुत वि.अन्वय माळी (5गुण);
अन्वय झेंडे (4.5गुण) बरोबरी वि. समर्थ पातोडेकर (4.5गुण).
महत्वाच्या बातम्या –
रोहित आणि विराटच्या खांद्यावर वर्ल्डकपसाठी अतिरिक्त जबाबदारी! स्वतः कर्णधारानेच केला खुलासा
ASIA CUP SQAUD: डावललेल्या चहल-अश्विनच्या भविष्याबद्दल काय म्हणाला रोहित? नक्की वाचा