आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) श्रीलंकेचा युवा क्रिकेटपटू प्रविण जयविक्रमावर (Praveen Jayawickrama) 1 वर्षाची बंदी घातली आहे. श्रीलंकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रविण जयविक्रमावर आयसीसी भ्रष्टाचार विरोधी संहितेचे (ACU) उल्लंघन केल्याचा आरोप आहे. दरम्यान 26 वर्षीय क्रिकेटपटू प्रवीण जयविक्रमाने (Praveen Jayawickrama) हे सर्व आरोप स्वीकारले आहेत.
प्रविण जयविक्रमाने (Praveen Jayawickrama) 2021 मध्ये श्रीलंकेसाठी पदार्पण केले होते. त्याने आपल्या कामगिरीने तिन्ही फॉरमॅटमध्ये स्थान मिळवले. मात्र, त्याला संघातील स्थान कायम राखता आले नाही. जयविक्रमाने जून 2022 मध्ये आपल्या देशासाठी शेवटचा सामना खेळला होता. यानंतर तो संघाबाहेर राहिला. त्यानंतर जयविक्रमाला आतापर्यंत संघात स्थान मिळवता आले नाही.
जयविक्रमाने श्रीलंकेसाठी 5 कसोटी, 5 एकदिवसीय आणि 5 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्यावर आयसीसी भ्रष्टाचार विरोधी संहिता प्रतिबंधक युनिटच्या तपासात विलंब किंवा अडथळा आणल्याचा आरोप आहे. याशिवाय दस्तऐवज नष्ट करणे किंवा इतर माहिती लपवणे हे देखील त्याच्यावरील आरोपांमध्ये समाविष्ट आहे. आयसीसीने भ्रष्टाचार विरोधी संहितेअंतर्गत हा गुन्हा मानला आणि त्याच्यावर 1 वर्षाची बंदी घातली.
प्रविण जयविक्रमाच्या (Praveen Jayawickrama) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने श्रीलंकेसाठी 5 कसोटीच्या 10 डावात गोलंदाजी करताना 25.68च्या सरासरीने 25 विकेट्स त्याच्या नावावर केल्या आहेत. दरम्यान त्याचा इकाॅनाॅमी रेट 2.91 राहिला आहे. कसोटीमध्ये त्याने 2 वेळा फायफर, तर 1 वेळा 10 विकेट्स देखील देखील घेतल्या आहेत. 5 एकदिवसीय सामन्यात जयविक्रमाने 5 विकेट्स घेतल्या आहेत, तर 5 टी20 सामन्यात 2 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
SA20 Auction; दक्षिण आफ्रिकेचा स्टार सलामीवीर ठरला सर्वात महागडा खेळाडू
65 वर्षात तेंडुलकर, गावसकर, रोहितला जमलं नाही ते सरफराजनं करून दाखवलं!
147 वर्षाच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच बनवला असा रेकाॅर्ड, जो मोडीत काढणे अशक्य