पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी जारीच आहे. आज (6 सप्टेंबर) उंच उडी T64 प्रकारात भारताच्या प्रवीण कुमारनं सुवर्ण पदक जिंकलं. पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारताचं हे सहावं सुवर्णपदक आहे. स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 26 पदकं जिंकली आहेत.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रवीण कुमारनं 2.08 मीटरची विक्रमी उडी मारून पहिलं स्थान पटकावलं. हा नवा आशियाई रेकॉर्ड आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत 6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 11 कांस्य पदकं जिंकली आहेत.
उत्तर प्रदेशातील नोएडा येथील प्रवीण कुमार हा 21 वर्षीय ॲथलीट पॅरालिम्पिक उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा मरियप्पन थंगावेलू नंतर दुसरा भारतीय ठरला. युनायटेड स्टेट्सच्या डेरेक लोकिडेंटनं 2.06 मीटरच्या उडीसह रौप्य, तर उझबेकिस्तानच्या टेमुरबेक गियाझोव्हनं 2.03 मीटरच्या उडीसह कांस्यपदक जिंकलं. प्रवीण कुमारनं टोकियो पॅरिलिम्पिकमध्ये (2020) रौप्यपदक जिंकलं होतं.
उंच उडीच्या T64 प्रकारात असे खेळाडू भाग घेतात, ज्यांचे पाय काही कारणानं कापले गेले आहेत. हे खेळाडू कृत्रिम पाय लावून खेळतात.
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पदक विजेते भारतीय
(1) अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
(2) मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
(3) प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 100 मीटर शर्यत (T35)
(4) मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्य पदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
(5) रुबिना फ्रान्सिस (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
(6) प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 200 मीटर शर्यत (T35)
(7) निषाद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T47)
(8) योगेश कथुनिया (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष डिस्कस थ्रो (F56)
(9) नितीश कुमार (बॅडमिंटन) – सुवर्णपदक, पुरुष एकेरी (SL3)
(10) मनीषा रामदास (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SU5)
(11) तुलसीमाथी मुरुगेसन (बॅडमिंटन) – रौप्य पदक, महिला एकेरी (SU5)
(12) सुहास एल यथीराज (बॅडमिंटन) – रौप्य पदक, पुरुष एकेरी (SL4)
(13) शीतल देवी-राकेश कुमार (तिरंदाजी) – कांस्य पदक, मिश्र कंपाऊंड ओपन
(14) सुमित अँटील (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष भालाफेक (F64 श्रेणी)
(15) नित्या श्री सिवन (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SH6)
(16) दीप्ती जीवनजी (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला 400 मीटर (T20)
(17) मरियप्पन थांगावेलू (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुष उंच उडी (T63)
(18) शरद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T63)
(19) अजित सिंग (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष भालाफेक (F46)
(20) सुंदरसिंग गुर्जर (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, पुरुष भालाफेक (F46)
(21) सचिन सर्जेराव खिलारी (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष शॉटपुट (F46)
(22) हरविंदर सिंग (तिरंदाजी) – सुवर्णपदक, पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह ओपन
(23) धरमबीर (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुषांचा क्लब थ्रो (F51)
(24) प्रणव सुरमा (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष क्लब थ्रो (F51)
(25) कपिल परमार (जुडो) – कांस्य पदक, पुरुष ६० किलो (J1)
(26) प्रवीण कुमार (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष उंच उडी (T44)
हेही वाचा –
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटसोबत कट झाला होता? राजकारणात प्रवेश केल्यानंतर दिलं सूचक उत्तर
मुशीर खानचं नाव दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अजरामर, नवदीप सैनीसोबत मिळून रचला अद्भुत रेकॉर्ड!
भारतात पोहोचताच न्यूझीलंडची मोठी खेळी; टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूला प्रशिक्षक बनवले