आयपीएल२०२० साठी दिल्ली कॅपिटल्स संघात लेग स्पिनर प्रवीण दुबेचा समावेश करण्यात आला आहे. त्याला दुखापतग्रस्त अमित मिश्राऐवजी संघात स्थान देण्यात आले आहे. मिश्रा बोटाच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२० मधून बाहेर गेला आहे. त्याला ३ ऑक्टोबरला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झेल घेताना दुखापत झाली होती.
मिश्राऐवजी दिल्ली संघात निवड झालेला प्रवीण दुबेचा जन्म उत्तरप्रदेशमध्ये झाला आहे. पण तो देशांतर्गत क्रिकेट कर्नाटककडून खेळतो. त्याने मागीलवर्षी कर्नाटकला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये विजेतेपद मिळवून देण्याचा महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्याने ६ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच त्याने कर्नाटक प्रीमीयर लीगमध्येही शानदार कामगिरी केली आहे. त्याने २०१४-१५ च्या हंगामात हुबळी टायगर्सकडून ६ सामन्यात ७ विकेट्स घेतले होते. त्यानंतरच्या हंगामात त्याने ९ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे २०१६ आणि २०१७ आयपीएलसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्याला ३५ लाखांच्या किंमतीत खरेदी केले होते. पण त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.
तसेच तो सध्या बेंगलोरचा नेट गोलंदाज होता, त्यामुळे तो युएईमध्ये लगेचच आयपीएल खेळण्यासाठीही सज्ज होता.
त्याने आत्तापर्यंत १४ ट्वेंटी-ट्वेंटी सामने खेळले असून १६ विकेट्स घेतल्या आहेत.
सध्या दिल्ली संघात आर अश्विन, अक्षर पटेल आणि संदीम लामिछाने हे फिरकीपटू असून आता त्यात प्रवीणचाही समावेश झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई वि. पंजाब या ऐतिहासिक सामन्यातील खरा हिरो ‘हा’ एकच; जाणून घ्या कामगिरी
तू अजून थोडे षटकार खा आणि भारतात परत ये! युवराजने भारतीय गोलंदाजाची घेतली फिरकी