सर्व जगातील क्रिकेट रसिक ज्या सामन्याची आतरुतेने वाट बघत आहेत, तो सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान उदया रविवारी दुपारी 3 वाजता बेमिन्हमच्या एडगबस्टन मैदानावर खेळण्यात येणार आहे.
भारत या सामन्यात फेवरेट म्हणून खेळेल तर भारताला पराभवाचा धक्का देण्याचापर्यंत पाकिस्तान करेल. २०१६मध्ये झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती. भारत आतापर्यंत पाकिस्तानकडून विश्वचषकामध्ये एकदाही हरला नाही,पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने 2 वेळा भारताला मात दिली आहे. २०१३ मधील चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानला हरवून स्कोर२-१ केला आहे,पण उद्या होणाऱ्या सामन्यात जिंकून भारत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा स्कोर २-२ करणार का याकडे सर्व भारतीय रसिकांचे लक्ष लागले आहे.
खेळ पट्टीबद्दल
या मैदानावर २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडचा सामना पावसामुळे रद्द झाला. तरी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने चांगली धावसंख्या उभारली होती त्यावरून खेळपट्टी प्रथम फलंदाजी करण्यासाठी चांगली आहे असे दिसून येते. प्रथम फलंदाजी करणारा संघ ३००च्या आसपास धावसंख्या उभारले अशी खेळपट्टी आहे. सध्या याच जागेवर वातावरण ढगाळ आहे . त्यामुळे पावसाचं सावट सामन्यावर असणार आहेच.
मागील पाच सामने
भारत – हार,विजय,विजय,विजय,हार.
पाकिस्तान -विजय,विजय,हार,हार,हार.
महत्त्वाचे खेळाडू
भारत – विराट कोहली
भारताने मागील काही काळात जे सामने पाकिस्तान बरोबर खेळले आहेत त्या सर्व सामन्यांमध्ये विराटची कामगिरी उत्तम राहिली आहे. मग ते २०१५ विश्वचषकामधलं शतक असो वा २०१६ टी२० विश्वचषकामधील अर्धशतक असो, कोहलीने नेहमीच पाकिस्तान विरुद्ध आपला खेळ उंचावला आहे.
पाकिस्तान – महंमद आमिर
पाकिस्तान चा वेगवान गोलंदाज महंमद अमीरने आशिया कप २०१६ ला भारत विरुद्ध गोलंदाजी करताना आपली प्रतिभा दाखवून दिली होती. आता पाकिस्तानला ही अमीरकडून अशीच का ही अपेक्षा असणार आहे.
संभाव्य संघ
भारत – धवन,रोहित,कोहली,युवराज, धोनी,पांड्य,अश्विन,जडेजा,उमेश,भुवनेश्वर.
पाकिस्तान
अझर अली,अहमद शेहजाद, बाबर आजम,
महंमद हाफीज,शोहेब मलिक,सारफरझ इहमद,इमद वसीम,फहिम्म असर्फ, महंमद अमीर,जुनिद खान .
महास्पोर्ट्स ची भविष्यवाणी
भारताचा सध्याचा फॉर्म बघता भारत सहज सामना जिंकणार असे दिसून येत आहे पण जर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला आणि फलंदाजनीही त्याना साथ दिली तर काहीही होऊ शकते. पाकिस्तानला जिंकण्यासाठी अमीरकडून अपेक्षा असतील तर भारताला कोहलीकडून