भारतात खेळला जाणारा वनडे विश्वचषक चांगलाच रंगात आला आहे. शनिवारी (28 ऑक्टोबर) विश्वचषकाचे दोन सामने आयोजित केले गेले आहेत. त्यातील पहिला सामना बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हिमाचलच्या धरमशाला स्टेडियमवर हा सामना आयोजित केला गेला आहे.
ऑस्ट्रेलियन संघाच्या तुलनेत धरमशाला स्टेडियमवर न्यूझीलंड संघाला फायदा मिळू शकतो. कारण न्यूझीलंडने आपला मागचा सामनाही याच ठिकाणी खेळला आहे. या सामन्यात न्यूझीलंडला यजमान भारतीय संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. न्यूजीलंडने विश्वचषकाच्या चालू हंगामात खेळलेल्या पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकले आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची सुरुवात अपेक्षित झाली नव्हती. मात्र, मागच्या तिन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघ विजयी ठरला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे विश्वचषकाचे आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले गेले आहेत. यातील आठ सामने ऑस्ट्रेलियाने तर, तीन सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघ आगामी सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कुठलाच बदक करण्याच्या मनस्थितीत नसेल. डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव स्मिथ, मार्नस लॅबुशेन आणि मिचेल मार्श हे महत्वाचे फलंदाज फॉर्ममध्ये दिसत आहेत. तसेच फिरकीपटू ऍडम झाम्पा याने मागच्या तीन सामन्यांमध्ये चार किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे टॉम लॅथम य़ांच्या नेतृत्वातील न्यूझीलंड संघात टिम साऊदी याचे पुनरागमन होऊ शकते. उभय संघांतील सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 मिनिटांनी सुरू होईल.
दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेवन
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिंस (कर्णधार), डेविड वार्नर, मिशेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, मिशेल स्टार्क, जोश हेजलवुड, एडम जाम्पा.
न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टीरक्षक), डेवोन कॉनवे, विल यंग, रचिन रविंद्र, डेरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट.
महत्वाच्या बातम्या –
अल्लू अर्जुनने वॉर्नरला दिल्या हटके शुभेच्छा; इन्स्टा स्टोरी शेअर करत म्हणाला, ‘क्रिकेटच्या…’
इंग्लंड संघाबाबत वीरेंद्र सेहवागचं धक्कादायक विधान; म्हणाला, ‘इंग्लंडचा संघ अतिशय…’