---Advertisement---

‘साड्डा पंजाब हार्ट अटॅक देणं बंद करणार नाही,’ पंजाब किंग्जच्या विजयानंतर संघ मालकिणीची प्रतिक्रीया

---Advertisement---

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्स संघाला बलाढ्य पंजाब किंग्ज संघाने ४ धावांनी पराभूत केले. हा सामना पाहण्यासाठी पंजाब संघाची सह- संघ मालकीण प्रीती झिंटा हिने देखील उपस्थिती दर्शविली होती. हा सामना जिंकल्यानंतर तिने ट्विट करत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना २२१ धावा केल्या होत्या. त्यानंतर २२२ धावांचा पाठलाग करण्यासाठी , फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाच्या सलामी फलंदाजांना चांगली सुरुवात करून देण्यात अपयश आले होते. त्यानंतर संजू सॅमसनने एकहाती झुंज देत ११९ धावांची खेळी केली. शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना, संजू सॅमसन झेलबाद झाला आणि हा सामना पंजाब किंग्ज संघाने ४ धावांनी आपल्या नावावर केला.

हा श्वास रोखून ठेवणारा सामना पाहण्यासाठी, पंजाब किंग्ज संघाची मालकीण प्रीती झिंटा हीने देखील वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावली होती. हा सामना झाल्यानंतर तिने ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “वाह काय सामना होता. नवीन नाव आहे, नवीन जर्सी आहे, तरीसुद्धा साड्डा पंजाबने आम्हाला हार्ट अटॅक देणे बंद केले नाही. आमच्यासाठी हा परफेक्ट सामना नव्हता परंतु शेवटी हा सामना आमच्यासाठी परफेक्ट ठरला. वाह केएल राहुल, दीपक हुड्डा आणि संघातील इतर खेळाडू.”

पंजाब किंग्ज संघाची पुढील लढत १६ एप्रिल रोजी, ३ वेळेस आयपीएल विजेता ठरलेला संघ चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

हे पोरग भारीय, त्याला संधी देऊन पाहा; जेव्हा ‘या’ भारतीय क्रिकेटरने द्रविडकडे केली होती संजूची शिफारस

‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्काराचा मान यंदाही भारताच्या पारड्यात, ‘हा’ क्रिकेटपटू ठरला विजेता

ख्रिस गेलला बाद केल्यानंतर रियान परागचा आनंद अनावर, केला भन्नाट बिहू डान्स; व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---