---Advertisement---

रणजी ट्रॉफी: पहिल्या सामन्यासाठी मुंबई संघाची घोषणा, या खेळाडूंना मिळाले संघात स्थान

On: मंगळवार, डिसेंबर 3, 2019 8:45 PM
---Advertisement---

9 डिसेंबरपासून रणजी ट्रॉफी या भारतातील देशांतर्गत स्पर्धेला सुरुवात होत आहे. यावर्षीच्या रणजी ट्रॉफीच्या मोसमातील मुंबईच्या पहिल्या सामन्यासाठी 15 जणांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबईचा पहिला सामना 9 डिसेंबरपासून वडोदरा येथे बडोदा संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी निवड करण्यात आलेल्या मुंबईच्या 15 जणांच्या संघात अंजिक्य रहाणे, पृथ्वी शॉ यांचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच या संघाचे कर्णधारपद सुर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज आदित्य तरेकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

त्याचबरोबर जय बिश्त, शुभम रांजणे, शम्स मुलानी, शार्दुल ठाकूर आणि धवल कुलकर्णी यांचा देखील मुंबई संघात समावेश आहे.

तसेच श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे हे वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग असल्याने त्यांचा मुंबईच्या संघात रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यासाठी समावेश करण्यात आलेला नाही.

याबरोबरच मुंबई संघाचा नियमित सदस्य असलेला सिद्धेश लाड देखील यावर्षीच्या पहिल्या रणजी ट्रॉफी सामन्यासाठी उपलब्ध नसेल. काही सुत्रांच्या नुसार तो या दरम्यान विवाहबंधनात अडकणार आहे.

असा आहे बडोदा विरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईचा संघ –

सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे (उपकर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, जय बिश्त, शुभम रांजणे, आकाश पारकर, सर्फराज खान, शम्स मुलानी, विनायक भोईर, शशांक अत्तरदे, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी आणि एकनाथ केरकर.

https://twitter.com/Maha_Sports/status/1201871135543058432

https://twitter.com/Maha_Sports/status/1201882288612618241

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---