भारताचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये जवळजवळ अडीच महिन्यांंनंतर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. त्याची 21 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धेसाठी 15 जणांच्या मुंबई संघात निवड करण्यात आली आहे.
शॉला मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना डाव्या पायाच्या घोट्याची दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेलाही मुकावे लागले होते.
रहाणेकडे कर्णधारपद-
इंदोर येथे होत असलेल्या या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबई संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या स्पर्धेत शॉ बरोबरच रहाणेच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे.
रहाणेची भारत अ संघाकडून इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध खेळताना चांगली कामगिरी झाली होती. त्याने दोन अर्धशतके इंग्लंड लायन्स विरुद्ध केली होती. तसेच इराणी कपमध्येही शेष भारताकडून विदर्भाविरुद्ध खेळताना त्याने दुसऱ्या डावात 87 धावांची खेळी केली होती.
त्याचबरोबर सईद मुश्ताक अली ट्रॉफ स्पर्धेसाठी मुंबई संघात श्रेयस अय्यर, धवल कुलकर्णी, सुर्यकुमार यादव आणि शार्दुल ठाकूर या खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.
असा आहे मुंबईचा संघ-
अजिंक्य रहाणे(कर्णधार), पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, धवल कुलकर्णी, सिद्धेश लाड, आदित्य तरे, सुर्य कुमार यादव, आकाश पारकर, एकनाथ केरकर, धुर्मिल मटकर, शाम्स मुलानी, शुभम रांजणे, तुषार देशपांडे, रायस्टन डायस.
महत्त्वाच्या बातम्या-
–२००० सालापुर्वी पदार्पण केलेले हे ५ खेळाडू विश्वचषकानंतर घेऊ शकतात निवृत्ती
–२०१९ विश्वचषकानंतर निवृत्त होणाऱ्या ख्रिस गेलबद्दल कधी न ऐकलेल्या १० गोष्टी
–केएल राहुलची निवड करताना अजिंक्य रहाणेवर अन्याय? वाचा