---Advertisement---

किती आले, किती गेले; पण दिल्लीकडून सेहवागनंतर फक्त पृथ्वी शॉच करू शकला ‘हा’ भीमपराक्रम

On: रविवार, एप्रिल 10, 2022 5:11 PM
Prithvi-Shaw
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ हा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये विशेष प्रदर्शन न करू शकलेल्या पृथ्वी शॉची बॅट सध्या तळपताना दिसत आहे. रविवारी (१० एप्रिल) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२२मधील एकोणिसाव्या सामन्यात त्याने पुन्हा अर्धशतक झळकावले आहे. या शानदार खेळीसह त्याने नवा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाता संघाने प्रथम गोलंदाजी निवडली. परिणामी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि डेविड वॉर्नर दिल्लीकडून सलामीला फलंदाजीसाठी उतरले. या दोन्ही फलंदाजांनी मिळून पावरप्लेमध्ये ५८ धावांची भागीदारी रचली. यामध्ये पृथ्वी शॉच्या ३१ धावा आणि आणि वॉर्नरच्या २२ धावांचा समावेश आहे. या ३१ धावांच्या छोटेखानी खेळीसह पृथ्वी शॉने दिल्लीकडून (Delhi Capitals) त्याच्या पावरप्लेमधील १००० धावा पूर्ण केल्या (Prithvi Shaw 1000 Runs In Powerplay) आहेत. 

दिल्लीकडून आयपीएल पावरप्लेमध्ये १००० धावा करणारा पृथ्वी शॉ दुसराच खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) दिल्लीकडून हा पराक्रम केला होता. 

पृथ्वी शॉ आणि विरेंद्र सेहवागची दिल्लीकडून फलंदाजी कामगिरी
दरम्यान दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि सेहवागची फलंदाजी कामगिरी पाहायची झाल्यास, सेहवागने दिल्लीकडून ७९ सामने खेळताना २१७४ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १ शतक आणि १५ अर्धशतके निघाली आहेत. दुसरीकडे पृथ्वी शॉने ५७ सामने खेळताना १४६५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १२ अर्धशतके केली आहेत.

असे आहेत ११ जणांचे संघ
कोलकाता नाईट रायडर्स: अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिक सलाम, वरुण चक्रवर्ती

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, रिषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, सर्फराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद

महत्त्वाच्या बातम्या-

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुंबई ‘पलटण’ने आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच घेतला ‘हा’ निर्णय, तरीही पराभव साथ सोडेना

दिनेश कार्तिकपेक्षा कमी नाहीये त्याची पत्नी; आई बनण्याच्या ६ महिन्यानंतर ‘या’ खेळात रचला इतिहास, २ ‘गोल्ड’ नावावर

थर्ड अंपायरच्या निर्णयावर विराट कोहलीची आगपाखड, मैदानातून बाहेर जाताना रागाच्या भरात आपटली बॅट; पाहा रिऍक्शन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---