---Advertisement---

कमनशिबी शॉ! पृथ्वी ठरला पदार्पणात ‘गोल्डन डक’ होणारा दुसरा भारतीय

On: रविवार, जुलै 25, 2021 10:00 PM
---Advertisement---

श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (२५ जुलै) ३ टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतासाठी सलामीवीर पृथ्वी शॉ व फिरकीपटू वरूण चक्रवर्ती यांनी पदार्पण केले. मात्र, हे पदार्पण त्याच्यासाठी विसरण्यासारखे राहिले. तो भारतीय डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. याच बरोबर त्याच्या नावे एक नकोशी आकडेवारी जमा झाली.

पृथ्वीने केले टी२० पदार्पण
तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाकडून युवा सलामीवीर पृथ्वी शॉ आणि जवळपास वर्षभरापासून पदार्पणाच्या प्रतीक्षेत असलेला मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्ती यांनी टी२० पदार्पण केले. शॉ भारताचा ८६ वा तर, वरूण ८७ टी२० क्रिकेटपटू बनला.

वनडे मालिकेत चमकदार कामगिरी करणारा शॉ या सामन्यात देखील उत्कृष्ट कामगिरी करेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंता चमिराने भारतीय डावाच्या पहिल्या चेंडूवर शॉला यष्टीरक्षक मिनोद भानुका याच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. यासोबतच पृथ्वी पदार्पणात पहिल्याच चेंडूवर म्हणजेच गोल्डन डकवर बाद होणारा दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी, केएल राहुल २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हरारे येथे पदार्पणात पहिल्याच चेंडूवर बाद झालेला.

भारताकडून पदार्पणातच सर्वप्रथम शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम माजी कर्णधार एमएस धोनी याच्या नावे आहे. तो भारतीय संघाने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या पहिल्यावहिल्या टी२० सामन्यात दोन चेंडू खेळून शून्यावर बाद झालेला.

पहिल्या टी२० सामन्यासाठी भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, इशान किशन, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती.

महत्त्वाच्या बातम्या –

‘श्रीलंकेविरुद्ध दमदार प्रदर्शनकरुन टी२० विश्वचषकासाठी ठोकणार दावेदारी’, शिखर धवनने स्पष्ट केला इरादा

‘बार्मी आर्मी की बारमध्ये आर्मी?’, ‘त्या’ ट्विटवर जाफरने शेअर केले मजेदार मीम

संपूर्ण वेळापत्रक: उर्वरित आयपीएल २०२१ हंगामाचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार अंतिम सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---