---Advertisement---

पृथ्वी शॉची टीम इंडियाकडून धमाकेदार कामगिरी सुरुच…

On: शुक्रवार, जुलै 6, 2018 12:53 PM
---Advertisement---

बुधवार (४ जुलै) पासून भारत अ वि. विंडीज अ यांच्यात इंग्लंडमधील बेकेनहॅम येथील केंट कौंटी क्रिकेट मैदानावर अनाधिकृत कसोटी सामना सुरु आहे.

या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताच्या पृथ्वी शॉने ७४ चेंडूत १ षटकार आणि १८ चौकारांच्या मदतीने १०१ धावा करत शतक झळकावले.

भारतीय अ संघाने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सलमीवीर पृथ्वी शॉच्या ७४ चेंडूत १०१ धावा आणि मयांक अग्रवालच्या ७१ चेंडूत ५६ धावांच्या मोबदल्यात बिनबाद १५९ धावा केल्या आहेत.

या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ १३३ धावांवर सर्वबाद झाला होता. तर विंडीजने पहिल्या डावात सर्वबाद ३८३ धावा करत २५० धावांची भक्कम आघाडी घेतली होती.

पहिल्या डावात भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली होती. हनुमा विहारी ३७ आणि विजय शंकर ३४ वगळता एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नव्हता.

पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवालने दुसऱ्या डावात मात्र भारतीय संघाला सुस्थितीत पोहचवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-फिफा विश्वचषक: फ्रान्सला उरुग्वेविरुद्ध पराजयाचा दुष्काळ…

-आजचा सामना धोनीसाठी ठरणार खास; वाढदिवसाच्या एक दिवस आधीच…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment