टी20 विश्वचषकात भारतीय संघाला अपेक्षित यश मिळाले नाही. उपांत्य फेरीत भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले. त्यानंतर आता टी20 संघाचा कर्णधार बदलला जावा अशी मागणी होत आहे. तशा प्रकारच्या हालचाली देखील सुरू झाल्याचे सांगण्यात येतेय. अष्टपैलू हार्दिक पंड्या हा भारताचा पुढील कर्णधार होऊ शकतो. मात्र, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने पंड्यासह युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा देखील नेतृत्वासाठी योग्य पर्याय असल्याचे म्हटले आहे.
टी20 संघाचा नवा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्या याच्या नावाची लवकरच घोषणा होऊ शकते. हार्दिक यावर्षी आयपीएलमध्ये आपल्या गुजरात टायटन्स संघाला विजेतेपद मिळवून दिलेले. त्यानंतर त्याला दोन मालिकांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. या दोन्ही मालिकांमध्ये भारतीय संघ विजेता ठरला. त्यामुळे नेतृत्वाच्या बाबतीत हार्दिक सर्वात आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
त्याचबरोबर गौतम गंभीरने हार्दिकसह पृथ्वी शॉ हा देखील नेतृत्वाचा पर्याय ठरू शकतो असे म्हटले. गंभीर म्हणाला,
“मी हार्दिकला पुढील कर्णधार म्हणून पाहत आहे. त्याचवेळी पृथ्वी शॉ हा देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो. मला तो एक आक्रमक कर्णधार वाटतो. त्याच्या बाबतीत अनेक चर्चा होत असतात. मात्र, प्रशिक्षकांचे हेच काम असते की, खेळाडूकडून उत्कृष्ट कामगिरी करून घ्यावी.”
पृथ्वी हा सध्या भारताच्या कोणत्याच संघात आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली झाली असली तरी, त्याला संघात स्थान मिळाले नाही. पृथ्वीच्याच नेतृत्वात भारताच्या अंडर नाईन्टीन संघाने 2018 मध्ये विश्वचषक जिंकलेला. तसेच, त्याच्या नेतृत्वात मुंबईने विजय हजारे ट्रॉफी देखील आपल्या नावे केलेली.
(Prithvi Shaw Contender For India Captaincy Gautam Gambhir Said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद करा पण आमचा कुठं! ऋतुराज गायकवाडचा नाबाद द्विशतकी धमाका
वनडे विश्वचषक 2023साठी भारत, अफगाणिस्तानबरोबर ‘हे’ सहा संघ पात्र; दोन चॅम्पियन्स संघाना करावे लागणार श्रम