भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा सातत्याने चर्चेत असतो. मागील अनेक दिवसांपासून तो भारतीय संघात खेळलेला नाही. असे असताना देखील मैदानाच्या बाहेरील काही कृतींमुळे तो माध्यमातून चर्चिला जातो. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर खास करून इंस्टाग्रामवर पोस्ट करत असलेल्या त्याच्या स्टोरीमुळे तो अप्रत्यक्षरीत्या आपली स्थिती सांगताना दिसतो. नुकतीच त्याने अशीच एक स्टोरी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेली.
पृथ्वी आयपीएलच्या समाप्तीनंतर आता विश्रांती घेत आहे. आगामी काळात तो पश्चिम विभागासाठी दुलिप ट्रॉफी खेळताना दिसेल. आयपीएलमधील खराब कामगिरीनंतर त्याच्यावर चांगलं कामगिरी करण्याचा दबाव असेल. असे असताना त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. ज्यामध्ये तो आयुष्याचे धडे देताना दिसतोय. त्याने पोस्ट केलेल्या स्टोरीमध्ये लिहिले आहे,
‘जिंदगी से यही सीखा है की, मेहनत करो रुकना नहीं, और जिंदगी मे हालात कैसे भी हो किसी के सामने झुकता नही’
त्याने काही मिनिटानंतर ही स्टोरी डिलीट देखील केली. मात्र, त्यानंतर लोक त्याला तत्त्वज्ञ म्हणत आहेत. यापूर्वी देखील त्याने अशा प्रकारच्या इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केल्या होत्या. तसेच काही वेळा साईबाबा यांच्या इंस्टाग्राम स्टोरी देखील तो पोस्ट करत असतो.
यावर्षी आयपीएलमध्ये त्याची कामगिरी अत्यंत सुमार राहिलेले. संपूर्ण स्पर्धेत तो केवळ एक अर्धशतक झळकावू शकलेला. त्यापूर्वी मुंबई येथील रस्त्यांवर एका मॉडेल सोबत त्याची मारहाण झालेली. या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
(Prithvi Shaw Cryptic Instagram Story About Life Lesson)
महत्वाच्या बातम्या-
चेतन शर्मा पुन्हा बनले निवडकर्ते! IPLच्या फ्लॉप खेळाडूला बनवून टाकलं संघाचा कर्णधार, वाचाच
Ashes मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे पाच गोलंदाज, यादीतील दोघांनी घेतलाय जगाचा निरोप