---Advertisement---

चेन्नईविरुद्ध दिल्लीच्या विजयाचा नायक ठरलेल्या पृथ्वी शॉने केला भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ

On: रविवार, सप्टेंबर 27, 2020 3:55 PM
---Advertisement---

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील सातव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याने केलेल्या खेळीमुळे दिल्ली संघाला चेन्नई संघाविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा 44 धावांनी पराभव केला.

या विजयानंतर दिल्ली संघाने एका पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत सर्वच खेळाडूंनी खूप मजा केली. इतकेच नाही तर पार्टीदरम्यान पृथ्वी शॉ याने जोरदार डान्स केला. या पार्टीचा आणि पृथ्वी शॉच्या डान्सचा व्हिडीओ दिल्ली कॅपिटल्स संघाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

 

चेन्नई विरुद्ध झालेल्या या सामन्यात पृथ्वीने 43 चेंडूत 63 धावा केल्या. तो सामन्यात सहजपणे फटके खेळत होता. त्याने 9 चौकार आणि एक षटकार ठोकला. त्याच्या कारकिर्दीतील हे पाचवे अर्धशतक होते. चांगल्या सुरुवातीनंतर डावखुरा फलंदाज पंत (25 चेंडूत नाबाद 37) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (22 चेंडूत 26) यांनी तिसर्‍या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. त्यामुळे दिल्लीने चेन्नईला 176 धावांचे आव्हान दिले होते. पण चेन्नईला केवळ 131 धावाच करता आल्या.

सलग दुसर्‍या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली. केवळ अनुभवी फलंदाज फाफ डुप्लेसिसने सर्वाधिक 43 धावा केल्या. चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---