भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ आता नव्या वादात सापडताना दिसत आहे. पृथ्वी व त्याच्या मित्राने बुधवारी (15 फेब्रुवारी) विलेपार्ले येथे काही चाहत्यांशी वाद घातल्याचे वृत्त समोर आले होते. आता या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामध्ये तो थेट रस्त्यावर मॉडेल सपना गिल व तिच्या मित्रांसोबत झटापट करताना दिसून येतोय.
https://twitter.com/mohsinofficail/status/1626167356228796416?t=1vC6eFWtchxnSwSBx-jcXQ&s=19
नुकतेच वृत्त आले होते की, पृथ्वी शॉ याची बुधवारी रात्री विलेपार्ले येथील एका नाईट क्लबमध्ये काही लोकांशी बाचाबाची झाली होती. पृथ्वी शॉ याच्याशी हे लोक सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पृथ्वीने नकार दिल्यानंतर या आठ जणांनी मिळून त्याच्या मित्राच्या गाडीवर बेसबॉल बॅटने हल्ला केला. त्यानंतर ओशिवारा पोलीस ठाण्यामध्ये शॉ व त्याच्या मित्राने तक्रार दाखल केली होती.
आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामध्ये शॉ इंस्टाग्राम इन्फ्लूएन्सर व मॉडेल सपना गिल हिच्याशी रस्त्यावर वाद घालताना दिसतोय. सुरुवातीला पृथ्वी तिच्याकडून मोबाईल हिसकावताना दिसला आहे. तसेच, सपना ही त्याने आम्हाला मारहाण केली असा आरोप करताना देखील दिसतेय. यासोबतच काहीजण हे सर्व लोक मद्यपान केले असल्याचे सांगताना देखील दिसत आहेत.
पृथ्वी हा रणजी ट्रॉफी तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्यानंतर त्याचा राष्ट्रीय संघात देखील समावेश केला गेला. मात्र, तो अंतिम अकरामध्ये आपली जागा बनवण्यात यशस्वी ठरला नाही. त्याने भारतासाठी आतापर्यंत 5 कसोटी, 6 वनडे आणि 1 टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.
(Prithvi Shaw fight video: Cricketer gets involved in physical brawl allegedly outside night club with model)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या कसोटीत डेविड वॉर्नर खेळणार की नाही? कर्णधार पॅट कमिन्सने दिले उत्तर
दिल्लीत बदलले टीम इंडियाचे हॉटेल! ‘या’ कारणाने बोर्डाला घ्यावा लागला निर्णय