भारताचा युवा प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉ आयपीएल 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. या हंगामात त्याची कामगिरी चांगली नव्हती. याच कारणामुळे हैदराबादविरुद्ध झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. जरी पृथ्वी मैदानात चांगली कामगिरी करू शकला नाही, तरीही त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काही अशा गोष्टी घडत आहेत, ज्यामुळे तो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
वास्तविक, सोमवारी (9 नोव्हेंबर) त्याच्या वाढदिवशी अभिनेत्री प्राची सिंग हिने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्राचीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर इंस्टा स्टोरीमध्ये पृथ्वीचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असे लिहिले. याशिवाय शुभेच्छा देताना या अभिनेत्रीने हार्ट इमोजीही शेअर केला आहे.
यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध तर नाही ना? या चर्चेला उधाण आले आहे. प्राचीने काही दिवसांआधी पृथ्वीच्या फोटोवर टिप्पणी केली होती. अभिनेत्री प्राची सिंह टीव्ही सीरियल ‘उडान सपने की’मध्ये दिसली होती. या मालिकेत ‘प्राची’ सिमरच्या बहिणीची भूमिका साकारत होती.
आयपीएल 2020 मध्ये पृथ्वीला 13 सामन्यांत केवळ 228 धावा करता आल्या. या हंगामात त्याने दोन अर्धशतके ठोकली आहेत. 66 धावा ही त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या होती. त्यानंतर त्याला फॉर्म टिकवून ठेवण्यात अपयश आले.
आयपीएल 2020 चा अंतिम सामना मंगळवारी (10 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटलमध्ये होईल. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होईल. दिल्लीने प्रथमच आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे, तर मुंबई आयपीएल कारकिर्दीतील आपला सहावा अंतिम सामना खेळेल.
https://www.instagram.com/p/CGfJlb0pCMA/?igshid=1n1pyz63fh5tt
https://twitter.com/VishalSports123/status/1326054285210124289?s=19
मुंबई इंडियन्सने 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. अशावेळी या हंगामात मुंबईला जेतेपद जिंकण्यात यश आले, तर पाचव्यांदा किताब जिंकत मुंबई इतिहास रचणार आहे. दिल्ली कॅपिटलसाठी आयपीएल विजेतेपद जिंकण्याची ही सुवर्णसंधी आहे. दिल्लीत धवन, स्टॉयनिस आणि रबाडासारखे खेळाडू आहेत जे या हांगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.
या अंतिम सामन्यात पृथ्वीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
AUS vs IND : आता मैदानात घुमणार प्रेक्षकांचा गजबजाट; ऑस्ट्रेलिया क्रिकेटने केली मोठी घोषणा
IPL FINAL : धवन, पंत, हेटमायर सारख्या डावखुऱ्या फलंदाजांसाठी मुंबई ‘हा’ गोलंदाज उतरवणार मैदानात
IPL – फायनलपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुंबईला खास संदेश, प्रत्येक खेळाडूला ‘ही’ गोष्ट समजायला हवी
ट्रेंडिंग लेख-
चौथी शिकलेल्या पोराच्या फिरकीपुढे भल्याभल्यांनी घेतलीये गिरकी; वाचा मुंबईच्या प्रमुख फिरकीपटूबद्दल
विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय






