दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये,रविवारी (२ मे ) अटीतटीचा सामना पहायला मिळाला होता. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना अनेक मजेशीर क्षण पाहायला मिळाले. यामध्ये शिखर धवनची विनोदी प्रतिक्रीया असो किंवा पृथ्वी शॉने केलेला अजब थ्रो. याशिवाय पृथ्वी शॉचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना १६६ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. पंजाब संघाकडून तिसरे षटक टाकण्यासाठी रायले मेरीडीथ गोलंदाजीला आला होता. याच षटकातील शेवटचा चेंडू मेरेडिथने १४१च्या गतीने टाकला होता. तो चेंडू सरळ जाऊन फलंदाजी करत असलेल्या पृथ्वी शॉच्या एल गार्डला लागला होता. हा चेंडू लागताच पृथ्वी शॉला प्रचंड वेदना झाल्या होत्या. त्यानंतर फीजिओ देखील मैदानात आले होते. पृथ्वी शॉला वेदनेत पाहून मोहम्मद शमी देखील विचारपुस करण्यासाठी आला होता. काही वेळ वेदना सहन केल्यानंतर पृथ्वी शॉ पँटच्या आत पाहून हसताना दिसून आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Vigneshcdm1/status/1389027277262888961?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1389027277262888961%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.crictracker.com%2Fipl-2021-prithvi-shaw-looks-into-his-pants-and-smiles-after-getting-hit-on-the-crotch-in-the-match-against-pbks%2F
मयंकच्या खेळीच्या जोरावर पंजाबने केल्या होत्या १६६ धावा
या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना, ६ बाद १६६ धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार मयंक अगरवालने सर्वाधिक ९९ धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने ८ चौकार आणि ४ षटकार लगावले होते. तर डेविड मालनने २६ धावांचे योगदान दिले होते. ख्रिस गेल या सामन्यात देखील मोठ्या धावा करण्यास अपयशी ठरला होता. तो अवघ्या १३ धावा करत माघारी परतला होता.
दिल्ली कॅपिटल्स संघाने मिळवला एकहाती विजय
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शिखर धवनने सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली होती. तर पृथ्वी शॉ ने ३९ धावांचे योगदान दिले होते. दिल्ली कॅपिटल्स संघाने हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला होता. तसेच या विजयासह दिल्ली कॅपिटल्स संघाने गुणतालिकेत १२ गुणांसह पहिले स्थान गाठले आहे.
महत्वाच्या बातम्या:
पंजाब किंग्जसाठी आनंदाची बातमी! या दिवशी केएल राहुल परतणार संघात
एका धावेने शतक हुकले, पण मयंकच्या नावे झाला हा कीर्तिमान
आयसीसी वनडे क्रमवारीत न्यूझीलंड संघ बनला चॅम्पियन, टीम इंडिया आहे या स्थानावर