---Advertisement---

पंजाब किंग्जसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी केएल राहुल परतणार संघात

On: सोमवार, मे 3, 2021 6:04 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या दुसर्‍या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे. मात्र हा टप्पा सुरू होण्यापूर्वी पंजाब किंग्जच्या संघाला मोठा धक्का बसला होता. त्यांचा नियमित कर्णधार केएल राहुलवर या हंगामातून बाहेर होण्याची टांगती तलवार लटकत होती. त्याला अपेंडिक्सच्या दुखण्यामुळे हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागले होते.

मात्र आता पंजाबसाठी दिलासा देणारी बातमी समोर येते आहे. राहुल वरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर तो एका आठवड्यात पुन्हा एकदा संघात परतणार असल्याचे वृत्त आहे. एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर राहुल आपल्या नियमित रुटीनची सुरुवात करू शकेल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

त्यामुळे पंजाब किंग्जला या वृत्ताने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र राहुलला संघात परतण्यापूर्वी विलगीकरणाचा कालावधी पार करावा लागला. याबाबत आयपीएलच्या आयोजन समितीशी बोलून पंजाब किंग्जचे संघ व्यवस्थापन राहुलच्या विलगीकरणाचा कालावधी निश्चित करतील. हा कालावधी पूर्ण केल्यावरच राहुलला बायो बबल मध्ये प्रवेश करता येईल.

पंजाबने ट्विट करत दिली होती माहिती

पंजाब-राजस्थान सामना होण्यापुर्वी पंजाब संघाने ट्विट करत राहुलच्या आजाराबद्दल माहिती दिली होती. त्यांनी लिहिले होते की ‘केएल राहुलला काल रात्री ओटीपोटात खूप वेदना होत होत्या. त्याच्यावर ओषधांचाही परिणाम होत नसल्याने त्याला पुढील तपासणीसाठी इमर्जन्सी रुममध्ये नेण्यात आले. त्यावेळी त्याला अपेंडिक्सचा त्रास होत असल्याचे निदान झाले आहे. ही समस्या शस्त्रक्रियेनंतर सोडवली जाऊ शकते. त्याचमुळे त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.’

पंजाबला बसला होता दुहेरी धक्का
राहुलच्या अनुपस्थितीत पंजाब संघाने मयंक अगरवालच्या नेतृत्त्वाखालील राजस्थानविरुद्ध सामना खेळला होता. या सामन्यात अगरवालने कॅप्टन्सी इनिंग खेळताना नाबाद ९९ धावा केल्या. परंतु संघातील इतर खेळाडू विशेष कामगिरी न करु शकल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने २० षटकात ६ बाद १६६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्ली संघाने १७.४ षटकातच ३ विकेट गमावत त्यांचे लक्ष्य पूर्ण केले आणि सामना खिशात घातला. त्यामुळे आता राहुलचे लवकरात लवकर संघात परत येणे, पंजाबला बाद फेरीसाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“मी खरचं चकित झालोय, त्याने कायमच…,” तीनवेळच्या ऑरेंज कॅप विजेता वॉर्नरला संघाबाहेर केल्याने दिग्गज संतापला

आवड, स्टाईल की अजून काही; एकवेळ डोक्यावर भरगच्च केस असलेला गब्बर आता का ठेवतो टक्कल? वाचा

भर मैदानात शिखर धवनने दिली हार्ट अटॅक आल्याची रिऍक्शन, असं नेमकं काय घडलं? घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---