---Advertisement---

आवड, स्टाईल की अजून काही; एकवेळ डोक्यावर भरगच्च केस असलेला गब्बर आता का ठेवतो टक्कल? वाचा

On: सोमवार, मे 3, 2021 4:33 PM
---Advertisement---

भारतीय संघात ‘गब्बर’ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारा शिखर धवन हा आयपीएल २०२१ स्पर्धेत तुफान फटकेबाजी करताना दिसून येत आहे. रविवारी (२ मे) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात शिखर धवनच्या नाबाद ६९ धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता.

तसेच शिखर धवन मैदानाबाहेर आपल्या हटके लूकसाठीही तितकाच प्रसिद्ध आहे. तसे तर, तुम्हालाही हा प्रश्न नेहमी पडत असेल की, शिखर धवन कधीही केस का वाढवत नाही? चला तर जाणून घेऊया…

शिखर धवनने जेव्हा क्रिकेटमध्ये एन्ट्री केली होती, तेव्हा त्याच्या डोक्यावर भरपूर केस होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून त्याने टक्कलच ठेवले आहे. अनेकांनी त्याला याबाबत प्रश्नही केले होते. परंतु त्याने याबाबत कुठलाही खुलासा केला नव्हता. परंतु लॉकडाऊन सुरू असताना शिखर धवनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर प्रश्न उत्तरांचे एक सत्र आयोजित केले होते. ज्यामध्ये एका चाहत्याने त्याला हेअरस्टाइल बद्दल प्रश्न विचारला होता.

त्याने विचारले होते की, “तुम्ही तुमच्या डोक्यावर केस का ठेवत नाही?” यावर शिखर धवनने मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटले होते की, “कारण मी केसंशिवाय खूप चांगला दिसतो. याबरोबरच केस धुवायला लागणाऱ्या शॅम्पूची देखील बचत होते.” आणि पुढे त्याने हसायचा ईमोजी टाकल्या होत्या.

Photo Courtesy: Instagram/@shikhardofficial

मैदानात देखील आपल्या स्टाईलमुळे असतो चर्चेत
शिखर धवन आपल्या हटके लूकसह मैदानात क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या हटके ग्लासेसमुळेही तितकाच चर्चेत असतो. त्याचे ग्लासेस पाहून इंग्लंड संघाचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन देखील फिदा झाला होता. यासोबतच तो आपल्या गब्बर स्टाइल सेलिब्रेशनमुळेही चर्चेत असतो.

पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप
रविवारी (२ मे) पंजाब किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात शिखर धवनने ६९ धावांची खेळी केली होती. यापूर्वी पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुल ऑरेंज कॅपचा मानकरी होता. परंतु या ६९ धावांच्या खेळीमुळे शिखर धवनने पुन्हा एकदा ऑरेंज कॅप मिळवली आहे. धवनने या हंगामात आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. यात त्याने ३८० धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलला कोरोनाच दणका! दिल्ली स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफचे ‘इतके’ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

भर मैदानात शिखर धवनने दिली हार्ट अटॅक आल्याची रिऍक्शन, असं नेमकं काय घडलं? घ्या जाणून

भर मैदानात शिखर धवनने दिली हार्ट अटॅक आल्याची रिऍक्शन, असं नेमकं काय घडलं? घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---