---Advertisement---

पृथ्वी शॉचा मोठा कारनामा! केवळ १८ चेंडूत अर्धशतक झळकावत केला ‘हा’ रेकॉर्ड

On: गुरूवार, एप्रिल 29, 2021 11:43 PM
---Advertisement---

अहमदाबाद। दिल्ली कॅपिटल्सने गुरुवारी (२९ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध इंडियन प्रीमीयर लीगच्या २५ व्या सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. दिल्लीच्या या विजयात सलामीवीर पृथ्वी शॉने मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे.

पृथ्वी शॉचा मोठा कारनामा
या सामन्यात कोलकाताने १५५ धावांचे आव्हान दिल्लीसमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून पृथ्वी शॉने पहिल्याच षटकात सहा चौकार मारले. तसेच त्याने १८ चेंडूत त्याचे ८ व्या षटकात त्याचे ९ वे आयपीएल अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे वैयक्तिक आयपीएलमधील वेगवान अर्धशतक ठरले.

यारोबरच दिल्लीकडून आयपीएलमध्ये केलेले हे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे. या यादीत त्याने रिषभ पंतची बरोबरी केली आहे. दिल्लीकडून पंतने देखील १८ चेंडूत २०१९ सालच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध अर्धशतक केले होते. या यादीत अव्वल क्रमांकावर ख्रिस मॉरिस आहे. मॉरिसने दिल्लीकडून २०१६ सालच्या आयपीएल हंगामात खेळताना गुजरात लायन्सविरुद्ध १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.

आयपीएल २०२१ मधील सर्वात जलद अर्धशतक 
शॉने आयपीएल २०२१ हंगामातील सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचाही विक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम दीपक हूडाच्या नावावर होता. त्याने १२ एप्रिल रोजी पंजाब किंग्सकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.

आयपीएल इतिहासात सर्वात जलद अर्धशतक
आत्तापर्यंत आयपीएल इतिहासात १८ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतक करण्याचा कारनामा १५ खेळाडूंनी केला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर केएल राहुल आहे. त्याने ८ एप्रिल २०१८ रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाबकडून खेळताना १४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.

शॉची शिखरबरोबर शतकी भागीदारी
शॉने १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवनबरोबर शतकी भागीदारीही रचली. या दोघांनी सलामीला खेळताना १३२ धावांची भागीदारी केली. शिखर ४६ धावांवर बाद झाला. तर शॉ ४१ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांवर बाद झाला. या दोघांच्या दमदार भागीदारीने दिल्लीचा विजय सोपा केला. दिल्लीने पुढे १६.३ षटकात १५६ धावा करत विजय निश्चित केला.

महत्त्वाच्या बातम्या –

Video: ‘शॉ’ची दमदार कामगिरी! आख्ख्या ‘पृथ्वी’वर एकच चर्चा; आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘असं’ घडलंय

आहा कडकच! ट्रेंट बोल्टच्या अप्रतिम यॉर्करने संजू सॅमसनचा उडवला मधला स्टंप, पाहा व्हिडिओ

“आयपीएलमध्ये जितक्या वेगाने धावा केल्या जात तितक्या वेगाने भारतात कोरोनामुळे मृत्यू होत आहेत”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---