भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ मागील दोन दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. 15 फेब्रुवारी रात्री मुंबई येथील एका कॅफेमध्ये त्याची काही लोकांसह भांडणे झाली होती. त्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झालेला. त्यानंतर आता या प्रकरणात पोलीस कारवाई झाली असून, शॉ आणि त्याच्या मित्रावर हल्ला करणाऱ्या लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.
बुधवारी (15 फेब्रुवारी) विलेपार्ले येथील एका कॅफेमध्ये पृथ्वी व त्याचे काही मित्र जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी इंस्टाग्राम इन्फ्लूएन्सर सपना गिल व तिच्या साथीदारांनी त्याच्याकडे सेल्फीची मागणी केली. पृथ्वीने आधी त्यासाठी परवानगी दिली. मात्र, त्यांनी अधिकच्या सेल्फी घेण्याची मागणी केल्यानंतर पृथ्वीने नकार दिला. त्यावेळी दोन्ही गटांमध्ये तिथे बाचाबाची झाली. पृथ्वी व त्याचे मित्र तिथून निघाल्यानंतर सपना व तीच्या मित्रांनी त्यांचा पाठलाग करत गाडीवर बेसबॉल बॅटने हल्ला केला.
त्यानंतर थेट रस्त्यावरच पृथ्वी व सपना यांच्यात झटापट झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला. त्यानंतर पृथ्वी व त्याच्या मित्रांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
हे संपूर्ण प्रकरण ज्या कॅफेमध्ये घडले त्या कॅफेच्या मालकांच्या साक्षीनंतर सपना गिल, तिचा मित्र शोभित ठाकूर व अन्य सहा जणांना पोलिसांनी अटक केली. या सर्वांना 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सर्वांवर सार्वजनिक ठिकाणी दंगा करणे, खंडणीची मागणी व प्रतिमा मलिन करणे इत्यादी कलमांतर्गत कारवाई करण्यात आली.
पृथ्वी शॉ हा सातत्याने भारतीय संघाबाहेर होता. नुकत्याच झालेल्या न्युझीलँडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला संघात जागा मिळालेली. मात्र, अंतिम अकरामध्ये स्थान बनवण्यात तो अपयशी ठरलेला.
(Prithvi Shaw Hustle Scandal Sapna Gill And His Friends Arrested By Mumbai Police)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबादला मिळाला कर्णधार? मयंक अन् भुवी नाही, तर अश्विनने ‘या’ खेळाडूचं घेतलं नाव
BREAKING: 31 मार्चपासून उडणार आयपीएल 2023 चा धुरळा, सीएसके-गुजरातमध्ये रंगणार उद्घाटनाचा सामना