भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निराशाजनक कामगिरी केली होती. परिणामी त्याला भारतीय संघातून स्थान गमवावे लागले होते. त्यानंतर त्याने विजय हजारे ट्रॉफी आणि आयपीएल २०२१ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. ज्याचे फळ म्हणून त्याला आगामी श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघातील खेळाडू श्रीलंकेला जाण्यापूर्वी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये विलगिकरणाचा कालावधी पूर्ण केला. अशातच पृथ्वी शॉने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघाला आगामी श्रीलंका दौऱ्यात ३ वनडे आणि ३ टी -२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकांमध्ये पृथ्वी शॉ आणि शिखर धवन हे दोघेही सलामी फलंदाजी करताना दिसून येऊ शकतात. त्यामुळे पृथ्वी शॉ फिटनेसवर जोर देताना दिसून येत आहे.
त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो ‘रोप वर्कआऊट’ करताना दिसून येत आहे. या व्हिडिओला त्याने हटके कॅप्शनही दिले आहे. त्याने लिहिले की,”जर देव प्रतिसाद देत नसेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, परीक्षा देत असताना शिक्षकही काही बोलत नसतात.” या व्हिडिओला आतापर्यंत २६ हजारपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे.
https://www.instagram.com/reel/CQoKWTpnAof/?utm_source=ig_web_copy_link
यापूर्वी देखील फोटो झाला होता व्हायरल
यापूर्वी देखील पृथ्वी शॉ ने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये त्याने डंबल सोबत एक फोटो शेअर केला होता. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून,” विलगिकरणातील आयुष्य” असे लिहिले होते. या फोटोवर देखील अनेक चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या होत्या. अनेक चाहते पृथ्वी शॉचा डंबल पाहून आश्चर्यचकित झाले होते. कारण त्याच्या डंबलवर ५० असे लिहिले होते. अनेक चाहत्यांना असे वाटले की, ते ५० किलोचे डंबल आहे. अनेकांना ही प्रश्न ही पडला होता की, पृथ्वी शॉ इतका वजनदार डंबल कसा काय उचलू शकतो? परंतु तो ५० किलोचा डंबल नसून ५० पाऊंड्सचा होता. ५० पाऊंड्स म्हणजे २२.५ किलो असते.
https://www.instagram.com/p/CQJPoatrNYN/
भारताच्या श्रीलंका दौऱ्यातील सामन्यांना १३ जुलै रोजी वनडे मालिकेने सुरुवात होईल.
महत्वाच्या बातम्या-
सतत फ्लॉप ठरत असलेल्या श्रीलंकन क्रिकेटपटूंवर चाहत्यांचा संताप; उचलले ‘हे’ मोठे पाऊल
अमेरिकेचा ‘हा’ धावपटू भविष्यातील ‘वेगाचा बादशाह’? वयाच्या १७ व्या वर्षी मोडलाय उसेन बोल्टचा विक्रम
भारतीय संघासाठी टी२० क्रिकेटच्या बाबतीत श्रीलंकेचा दौरा अगदी सोपा; पाहा ‘ही’ आकडेवारी