ऑस्ट्रेलियात सुरू असलेला टी20 विश्वचषक संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात टी20 आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाला न्यूझीलंड दौरा करायचा आहे. तसेच डिसेंबर महिन्यात भारत वनडे आणि कसोटी मालिकेसाठी बांगलादेशला जाईल. बीसीसीआयने सोमवारी (31 ऑक्टोबर) या दोन्ही दौऱ्यांसाठी एकूण चार संघ घोषित केले आहेत. यातील न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी मुंबईकर युवा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला संधी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, संधी न मिळाल्याने पृथ्वी निराश झालेला दिसला. त्याने आपल्या इंस्टाग्रामला थेट साईबाबांचा प्रोफाइल पिक्चर अपलोड करत आपली नाराजी व्यक्त केली.
The Instagram story of Prithvi Shaw. pic.twitter.com/wAT0vRp3vQ
— Johns. (@CricCrazyJohns) October 31, 2022
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुल व विराट कोहली यांनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे यावर्षी आयपीएल व सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी20 स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये असलेल्या मुंबईच्या पृथ्वी शॉ याला संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्याला संघात जागा मिळू शकली नाही. नाराज झालेल्या पृथ्वीने इंस्टाग्रामवर साईबाबांचे छायाचित्र स्टोरी लावत, “आशा आहे तुम्ही सर्व पाहत असाल” असे कॅप्शन दिले. तसेच प्रोफाइल पिक्चर ही साईबाबा यांचा अपलोड केला.
पृथ्वीने यावर्षी आयपीएलमध्ये 10 सामन्यात 152.87 च्या सरासरीने 283 धावा केल्या होत्या. तसेच सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत तो तुफान फॉर्ममध्ये दिसतोय. अवघ्या 7 सामन्यात 47.50 च्या सरासरीने व 191.27 च्या शानदार सरासरीने 285 धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार/ यष्टीरक्षक), शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी बीसीसीकडून एकूण चार संघांची घोषणा
फलंदाजांप्रमाणेच गोलंदाजांची भागादारीही महत्वाची, अर्शदीपने ‘या’ सहकाऱ्याला दिले यशाचे श्रेय





