सिडनी | बहुचर्चित भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना ६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्यापुर्वी परवापासून सुरु झालेल्या भारत विरुद्ध क्रिकेट आॅस्ट्रेलिया ११ सामन्यात आज पृथ्वी शाॅने शानदार सलामी दिली होती.
त्याने केएल राहुलबरोबर सलामीला येताना ६९ चेंडूत ६६ धावा केल्या. यात ११ चौकारांचा समावेश होता.
परंतु आज हा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या डाव्या पायाला झेल घेतना आज तिसऱ्या दिवशी दुखापत झाली. त्याला तात्काळ दवाखाण्यात नेण्यात आले आहे. तेथे त्याच्या पायाचे स्कॅन केले जाणार आहे. याची माहिती बीसीसीआयने ट्वीटद्वारे दिली आहे.
जेव्हा ही दुखापत झाली तेव्हा शाॅला मैदानावरुन टीम इंडियाच्या मेडिकल टीमने अक्षरश: उचलुन ड्रेसिंगरुममध्ये नेले.
Update: The medical team is assessing Prithvi Shaw at the moment. He hurt his left ankle while attempting to take a catch at the boundary ropes. Shaw is being taken to the hospital for scans #TeamIndia pic.twitter.com/PVyCHBO98e
— BCCI (@BCCI) November 30, 2018
भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना ६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्यापुर्वी शाॅचे दुखापतमधून भारतासाठी गरजेचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–पोस्टर बॉय राहुल चौधरीचा प्रो कबड्डीमध्ये भीमपराक्रम
–हॉकी विश्वचषक २०१८: भारताचे दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व कायम
–हॉकी विश्वचषक २०१८: कॅनडाला पराभूत करत बेल्जियमची विजयी सुरूवात
–Video: गोलंदाजांना सराव देताना तोल गेल्याने स्मिथ पडला खाली