भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना शुक्रवारी (२३ जुलै) कोलंबोच्या आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर खेळण्यात आला. श्रीलंकेच्या संघाने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर हा सामना ३ गड्यांनी जिंकला. मात्र, भारतीय संघाने ३ सामन्यांची ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली. या मालिकेतून वनडे पदार्पण करणारा सूर्यकुमार यादव मालिकावीर ठरला. मात्र, त्यानंतर प्रतिक्रिया देताना सूर्यकुमार यादवने भारताच्या युवा खेळाडूला ‘शो स्टॉपर’ असे विशेषण दिले.
मी त्याला ‘शो स्टॉपर’ म्हणेल
पदार्पणाच्या मालिकेतच मालिकावीर पुरस्कार पटकावल्यानंतर सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्याला भारतीय युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याच्याबाबत विचारले असता तो म्हणाला, “पृथ्वीसाठी मी एकच शब्द वापरेल तो म्हणजे शो स्टॉपर. ज्यावेळी तो खेळत असतो सर्वजण त्याचाच खेळ पाहत राहतात. त्याचा खेळ नेहमीच प्रेक्षणीय असतो. तसेच, त्याचा ॲटीट्युड देखील सकारात्मक भासतो. तो तंदुरुस्तीवर अधिकची मेहनत घेत असून, त्याला असे खेळताना पाहून आनंद होतो. त्याने नेहमी असेच खेळत राहावे.”
सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतात.
मालिकेत दोघांनीही केली जबरदस्त कामगिरी
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत मालिकावीर पुरस्कार पटकावणाऱ्या सूर्यकुमारने एका अर्धशतकासह १२७ धावा फटकावल्या. तर पृथ्वीने मालिकेतील पहिल्या सामन्यात २३ चेंडूत तुफानी ४३ धावांची खेळी करून सामनावीर पुरस्कार मिळवला होता. तसेच तिसर्या सामन्यातही तो ४९ धावा काढण्यात यशस्वी ठरला होता. त्याने तिन्ही सामन्यात मिळून १०५ धावा बनवल्या.
जबरदस्त फॉर्ममध्ये आहे पृथ्वी
भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणून ओळखला जाणारा पृथ्वी मागील काही काळापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये विजय हजारे ट्रॉफी व आयपीएल २०२१ मध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर त्याला पुन्हा एकदा भारतीय संघात निवडले गेले. सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील सलामीवीर शुबमन गिल दुखापतग्रस्त झाल्याने पृथ्वीला त्याचा बदली खेळाडू म्हणून इंग्लंडला पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘टीम इंडियाची प्रगती पाहून वाटतंय, आम्ही अजून २ संघ निवडून कोणतीही स्पर्धा जिंकू’
बिग हिटर लिव्हींगस्टोन! तब्बल १२२ मीटरच्या षटकारानंतर, पुन्हा ठोकला ‘इतका’ मोठा गगनचुंबी सिक्सर
दक्षिण आफ्रिकाच्या कर्णधाराने लाईव्ह सामन्यात वापरले नकोसे शब्द, आयसीसीने दिली शिक्षा