भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ उंचीने लहान आहे, त्याचे वय कमी आहे, पण त्याची स्वप्ने मात्र खूप मोठी आहेत. शॉने त्याच्या याच स्वप्नांना पंख दिले आणि यशाची एक- एक पायरी सर करत गेला. वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी त्याने भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. काही दिवसांपूर्वी २२ वर्षीय शॉने स्वतःसाठी महागडी गाडी घेतली आणि आता आलिशान घर खरेदी केले आहे.
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) त्याच्या वडिलांच्या मार्गदर्शनात लहानाचा मोठा झाला. त्याची आई तो अवघ्या चार वर्षाचा असताना मरण पावली होती. त्यानंतर त्याच्या वडिलांनीच त्याला सांभाळले आणि पुढे क्रिकेटपटू बनवले. शॉच्या वडिलांचे त्याच्या क्रिकेटसाठी स्वतःच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले. परंतु शॉने देखील वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. त्याच्या वडिलांना मुलगा पुढे जाऊन मोठे नाव करेल, याचा विश्वास होता आणि आता अगदी तसेच झाले आहे. मुंबईच्या वांद्रे रिक्लेमेशनमध्ये शॉने स्वतःचे घर खरेदी केले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्रत्येकाचेच स्वप्न असते की, स्वतःचे घर असावे. भारताचा फलंदाज पृथ्वी शॉने हे स्वप्न पूर्ण केले आहे. मुंबईत वाढलेल्या शॉने आता त्याच शहरातील महागड्या परिसरात घर घेतले आहे. मुंबईच्या वांद्रेमध्ये घरांच्या किमती खूपच जास्त असतात. याच परिसरातील त्याने एक प्रीमियम रेसिडेंशियल अपार्टमेंट खरेदी केले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या घराची किंमत १० कोटी ५० लाख रुपये आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया २२०९ स्क्वेअर फूट आहे, तर टेरेस १६५४ स्क्वेअर फूटाचे आहे. शॉने हे अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी ५२ लाख रुपये स्टँप ड्युटी भरली आहे.
दरम्यान पृथ्वी शॉच्या कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करत आला आहे. आयपीएल २०२२च्या मेगा लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने त्याला रिटेन केले होते. त्याच्या नेतृत्वात भारताच्या १९ वर्षाखालील संघाने २०१८ साली विश्वचषक जिंकला होता. अवघ्या १८व्या वर्षी जेव्हा त्याने भारतासाठी कसोटी पदार्पण केले, तेव्हा सर्वात कमी वयात पादार्पण सामन्यात शतक करणारा फलंदाज देखील बनला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राजस्थानविरुद्धच्या खेळीमुळे चर्चेत आलेल्या रिंकू सिंगला एकवेळ बीसीसीआयने केले होते बॅन, वाचा किस्सा
हार्दिक पंड्याच्या मुलाला कडेवर घेऊन राशिद खानने लावले ठुमके; पाहून तुमचेही थिरकतील पाय
पुण्यातील धोनीची लोकप्रियता पाहून भारावला निकोलस पूरन; म्हणाला, ‘मी कधीच विसरणार नाही…’