---Advertisement---

पृथ्वी शाॅचा मोठा खुलासा, कोहली-शास्त्री असे वागले ड्रेसिंगरुममध्ये

On: सोमवार, मार्च 18, 2019 7:09 PM
---Advertisement---

भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉने मागील काही काळापासून क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत भारताच्या वरिष्ठ संघातही प्रवेश केला. शॉने ऑक्टोबरमध्ये विंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेतून दमदार आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या पदार्पणाच्या मालिकेतच त्याने दोन सामन्यात 118.50 च्या सरासरीने 252 धावा केल्या.

त्याच्या या कामगिरीमुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही भारतीय संघात स्थान देण्यात आले. पण ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका सुरु होण्याआधीच शॉ सराव सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला जवळजवळ तीन महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागले.

पण आता तो आयपीएल खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याआधी त्याने कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्रींसह ड्रेसिंग रुम शेअर करतानाचा अनुभव सांगितला आहे.

त्याने आयएएनएसशी बोलताना सांगितले की ‘मी खूप शिकलो आहे. जेव्हा मी माझ्यापेक्षा 10 वर्षे जास्त अनुभव असलेल्या खेळाडूंच्या बरोबर ड्रेसिंग रुममध्ये पहिल्यांदा प्रवेश केला तेव्हा मी खूप नर्व्हस होतो. पण जेव्हा कर्णधार(विराट) आणि प्रशिक्षक(शास्त्री) मला म्हणाले की येथे कोणी वरिष्ठ आणि कनिष्ठ नाही. तेव्हा मी थोडा खुललो आणि त्यांना प्रश्न विचारुन भांडावून सोडले.’

शॉ यावर्षी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळणार आहे. त्याने मागीलवर्षी आयपीएलमध्ये 9 सामन्यात 27.22 च्या सरासरीने 245 धावा केल्या होत्या.

शॉवर काही दिवसांपूर्वी बेशिस्तपणामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून मायदेशात परतावे लागले असल्याचे आरोप झाले होते. पण या सर्व आफवा असल्याचे शॉने स्पष्ट केले आहे. तसेच तो दुखापतीतून सावरला नसल्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून मायदेशी परतला असल्याचे सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारे टाॅप ५ खेळाडू

बरोबर ७ वर्षापुर्वी याच दिवशी सचिनने घेतला होता मोठा निर्णय

पुन्हा तेच! धोनीने पुन्हा पळवले चाहत्याला पण चेन्नई सुपर किंग्जच्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment