मुंबईकर पृथ्वी शाॅ आपल्या कसोटी क्रिकेटमधील पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. इंग्लड दौऱ्यात त्याची निवड झाली होती. मात्र अंतिम अकरा मध्ये त्याला संधी मिळाली नव्हती.
विंडिजविरूद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला केएल राहुल सोबत सलामीला खेळण्याची संधी मिळणार आहे.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्याने सांगितले की बिकट परिस्थितीत धावा कश्या करायच्या हे मी विराट कोहलीकडून शिकलो आहे. विराटने इंग्लडच्या दौऱ्यात 5 कसोटी सामन्यात 593 धावा केल्या त्यात त्याने दोन शतक देखील ठोकली.
इंग्लडमधील विराटची खेळी आपल्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचे पृथ्वीचे म्हणणे आहे.
”इंग्लडमध्ये फलंदाजी करताना चेंडू स्पिन होतो. प्रतिस्पर्धी संघ खुप विचार करून खेळतो. कोणत्या फलंदाजाला कुठे चेंडू टाकायचा याचा त्यांचा चांगला अभ्यास असतो. संघाची धावसंख्या डोळ्यासमोर ठेवली की धावांची भुक आपोआप लागते.” असेही कोहलीने पृथ्वीला सांगितले.
दबावाच्या परिस्थितीत कसे खेळायचे याची प्रेरणा मला राहुल द्रविड आणि सचिन तेंडूलकर यांच्या कडून मिळते. ते नेहमी सांगायचे की अशा वेळी वर्तमानात राहिले पाहिजे.
भारतीय संघाचा विंडीजविरूद्धच्या मालिकेतील पहिला सामना 4 आॅक्टोबरपासून राजकोट येथे सुरू होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
- अखिल हेरवाडकरचे शानदार शतक; मुंबईचा गोव्यावर विजय
- …नाहीतर अर्जून तेंडूलकरच करिअर धोक्यात
- एशिया कपमध्ये खेळलेल्या २१ वर्षीय खेळाडूने पायलट बनण्यासाठी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती