---Advertisement---

मुंबईकर पृथ्वी शॉसाठी ही आहे सर्वात वाईट बातमी!

---Advertisement---

कर्नाटकविरुद्धच्या रणजी करंडक सामन्यादरम्यान युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉला खांद्याची दुखापत झाली. यामुळे शॉ या सामन्यातील दुसऱ्या डावात मुंबईकडून फलंदाजीसाठीही उतरू शकला नाही. या सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला.

दुखापतीनंतर शॉला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पाठविण्यात आले होते. पण आता त्याला भारत अ संघाच्या या महिन्यात सुरु होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यातील दोन सराव सामन्यांना मुकावे लागणार आहे.

शॉचा न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय अ संघात समावेश आहे. भारतीय अ संघ 10 जानेवारीला न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय अ संघ न्यूझीलंड अ संघाविरुद्ध 3 वनडे आणि 2 चार दिवसीय कसोटी सामने खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी 20 वर्षीय पृथ्वी शॉची भारतीय अ संघात निवड झाली आहे.

बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “भारतीय संघाचा फलंदाज पृथ्वी शॉला मुंबई आणि कर्नाटक यांच्यात रणजी करंडक सामन्याच्या पहिल्या दिवशी (3 जानेवारी) क्षेत्ररक्षण करताना डाव्या खांद्यावर दुखापत झाली.”

तसेच पुढे माहिती देण्यात आली आहे की “शॉवर सध्या बेंगळुरूमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दुखापतीवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे वनडे आणि चार दिवसीय कसोटी सामन्यांमधील(न्यूझीलंड दौऱ्यातील) त्याच्या सहभागावर नंतर निर्णय घेण्यात येईल.”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---