भारताचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ सध्या दुखापतीतून सावरत आहे. त्याला नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध सराव सामना खेळताना डाव्या पायाच्या घोट्याची दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेला मुकावे लागले.
या दुखापतीतून सावरुन पुन्हा क्रिकेटवर आणि अधिक धावा करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे ध्येय शॉ समोर आहे. याबद्दलच त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये त्याने ‘गली बॉय’ या अगामी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातील ‘अपना टाईम आयेगा’ या रॅपसाँगच्या शब्दांचा उपयोग केला आहे.
शॉने ट्विट केले आहे की, ‘अपना टाईम आयेगा…इंज्यूरी से फिट होके…मै और रन बनायेगा…अपना टाईम आयेगा…’
Aapna time aayega…
Injury se fit hoke…
Mein aur run banayega…
Aapna time aayega…#Gullycrickettointernationalcricket 🤣 #ps100 pic.twitter.com/lTRUmW7WaI— Prithvi Shaw (@PrithviShaw) January 30, 2019
शॉने ऑक्टोबरमध्ये विंडीज विरुद्ध राजकोट येथे कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने विंडीज विरुद्धच्या 2 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत 237 धावा करत मालिकावीराचा पुरस्कारही मिळवला होता.
त्याच्या या कामगिरीमुळे त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही भारतीय संघात स्थान मिळाले होते. परंतू त्याला त्याआधीच दुखापत झाल्याने भारतात परतावे लागले होते.
शॉने आत्तापर्यंत 17 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 60.93 च्या सरासरीने 1767 धावा केल्या आहेत. यात त्याने 8 शतके आणि 8 अर्धशतके त्याने केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–ट्रेंट बोल्ट प्रमाणेच न्यूझीलंडच्या या गोलंदाजांनी भारताला दिला आहे त्रास
–केएल राहुलचे विश्वचषकातील स्थान धोक्यात…?