तरुण वयात स्टारडम फार कमी क्रिकेटपटूंना मिळतं. मात्र एक क्रिकेटपटू आहे ज्यानं 18 वर्षांचा असताना आपल्या नेतृत्वाखाली भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून दिला. या उत्कृष्ट कामगिरीचं बक्षीस त्याला लवकरच मिळालं आणि 8 महिन्यांतच त्याची भारतीय कसोटी संघात निवड झाली. या युवा खेळाडूनंही संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि पहिल्याच कसोटीत शतक झळकावलं. मात्र आता या गोष्टीला 5 वर्ष उलटून गेली आहेत. आज हा खेळाडू टीम इंडियातून कधीचाच बाहेर पडला आहे. एवढच नव्हे तर तो पुढचा ‘उन्मुक्त चंद’ ठरू शकतो, अशी भीती दिग्गज पंच रिचर्ड कॅटलब्रो यांनी व्यक्त केली.
हो, तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. आपण बोलत आहोत पृथ्वी शॉ याच्याबद्दल. 24 वर्षीय पृथ्वी शॉ सध्या मुंबई विरुद्ध विदर्भ रणजी ट्रॉफी फायनलमध्ये खेळतो आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विदर्भाच्या यश ठाकूरनं पृथ्वीला क्लीन बोल्ड केलं. पृथ्वी हा चेंडू अजिबात समजू शकला नाही. बाद झाल्यानंतर तो काही सेकंद अवाक राहिला.
पृथ्वी शॉ आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. तर यश ठाकूर लखनौ सुपरजायंट्सचा भाग आहे. लखनौ फ्रँचायझीनं पृथ्वी शॉचा व्हिडिओ शेअर करून यश ठाकूरचं कौतुक केलं आहे. मात्र आता पंच रिचर्ड कॅटलब्रो यांनी जे लिहिलं ते पृथ्वी शॉच्या चाहत्यांना अस्वस्थ करू शकतं.
पृथ्वीचा व्हिडिओ शेअर करताना रिचर्ड केटलब्रो यांनी लिहिलं, “हे म्हणणं खूप घाईचं होईल, परंतु पृथ्वी शॉ दुसरा उन्मुक्त चंद सिद्ध होऊ शकतो.” रिचर्ड केटलब्रो यांच्या या पोस्टशी अनेक जणांनी सहमती दर्शवली, तर काहींनी म्हटलं की हे खूप लवकर आहे. काही यूजर्सनी पृथ्वी शॉची तुलना उन्मुक्त चंद आणि यश धुलशी केली.
Early to say, but, Prithvi Shaw seems to be new Unmukt Chand 👀 #RanjiTrophyFinal #MumvVid #Oscars #PrithviShaw pic.twitter.com/KBJrW5KiDk
— Richard Kettleborough (@RichKettle07) March 11, 2024
आम्ही तुम्हाला सांगतो, उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतानं 2012 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. या कामगिरीनंतर उन्मुक्त रातोरात स्टार बनला. मात्र उच्च अपेक्षांचं ओझं त्यांला पेलता आलं नाही. उन्मुक्तनं आयपीएल संघातही आपलं स्थान गमावलं. यानंतर तो अमेरिकेत गेला. आता तो अमेरिकन संघाकडून क्रिकेट खेळण्याच्या प्रयत्नात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Video : सामन्यादरम्यान ‘फिक्सर’ म्हटलं, मोहम्मद आमिर संतापानं भडकला; चाहत्याशी ‘तू-तू-मैं’
कुस्तीपटू विनेश फोगटनं ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये गोंधळ घातला, जाणून घ्या काय घडलं
IPL 2024 मध्ये तुमच्या आवडत्या संघाचं नेतृत्व कोणता खेळाडू करेल, जाणून घ्या एका क्लिकवर