आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही. त्याचबरोबर संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ हा पूर्णतः अपयशी ठरलेला दिसला. संघाने त्याला सहा सामन्यांमध्ये संधी दिली. मात्र, एकदाही तो निर्णायक भूमिका बजावू शकला नाही. त्याला अखेरच्या सामन्यातून संघा बाहेर देखील करण्यात आले होते. त्यानंतर आता पृथ्वी थेट संघासाठी शेफची भूमिका बजावताना दिसला.
New chef from Delhi.
???? (@PrithviShaw / Instagram) pic.twitter.com/u7taOvm5PP
— CricketGully (@thecricketgully) April 26, 2023
शॉ यावर्षी अत्यंत खराब फॉर्ममध्ये राहिला आहे. सहा सामन्यातील त्याची सर्वोच्च धावसंख्या 15 राहिली असून, मुंबई इंडियन्सविरुद्ध आली होती. त्याने या हंगामात सहा डावांमध्ये 12,7,0,15,0 व 13 अशा धावा केल्या. त्याला दोन वेळा खाते देखील खोलता आले नाही. शॉ यावर्षी देशांतर्गत हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला होता. त्यामुळे या आयपीएलमध्ये तो त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, तो या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही.
पृथ्वीने त्याच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये तो हॉटेलमध्ये एक पदार्थ बनवताना दिसून येतोय. अगदी कुशलतेने तो हे काम करताना दिसला. सोशल मीडियावर त्याच्या या खास कौशल्याची चर्चा होत आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघासाठी या आयपीएलची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली होती. डेव्हिड वॉर्नर याच्या नेतृत्वातील दिल्लीने आपले पहिले पाच सामने गमावले होते. त्यानंतर सलग दोन सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवण्यात यश आले आहे. स्पर्धेच्या उत्तरार्धात हीच लय कायम राखत, प्ले ऑफसाठी पात्र होण्याचा त्यांचा मानस असेल. मागील वर्षी दिल्लीला प्ले ऑफ खेळण्यात यश आले नव्हते.
(Prithvi Shaw Show His Chef Skill In Team Hotel Of Delhi Capitals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! रिंकूकडून 5 षटकार खाणारा गुजरातचा खेळाडू आजारी, 8 किलो वजनही उतरलं; पंड्याचा मोठा खुलासा
आयपीएलच्या पहिल्या 35 सामन्यात हे सहा धुरंधर चमकले, यादीत फक्त दोन भारतीय






