भारताचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉवर बीसीसीआयने डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 8 महिन्यांची बंदी घातली आहे. बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की त्याने अनवधानाने प्रतिबंधित पदार्थ घेतला आहे , जो सामान्यत: खोकल्याच्या औषधामध्ये आढळू शकतो.
शॉचे फेब्रुवारीमध्ये यूरिन सॅम्पल घेण्यात आले होते. या सॅम्पलमध्ये टर्बुटालिन हा प्रतिबंधित पदार्थ आढळून आला आहे. त्यामुळे बीसीसीआयने शॉवर 15 नोव्हेंबर पर्यंत बंदी घातली आहे.
या बंदीनंतर शॉने ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की ‘मला आजच कळाले आहे की मी नोव्हेंबर 2019 पर्यंत क्रिकेट खेळू शकणार नाही.’
‘हे यामुळे झाले की मी फेब्रुवारी 2019मध्ये सईद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईकडून खेळत असताना मला खोकला आणि सर्दी झाल्याने मी खोकल्याचे औषध घेतले, ज्यात प्रतिबंधिक पदार्थ होता, त्याबद्दल मला माहित नव्हते.’
‘मला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात पायाची दुखापत झाली होती. त्यानंतर मी त्यावेळी त्यातून बाहेर आलो होतो. मी या स्पर्धेतून (सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी) पुनरागमन करण्यास इच्छुक होतो. त्यामुळे मी उत्सुकतेच्या भरात काय सेवन कारावे याची सावधगिरी बाळगण्याच्या प्रोटोकॉलचे अनुसरण केले नाही.’
‘मी गंभीरतेने माझी चूक मान्य करत आहे. माझ्या शेवटच्या स्पर्धेत मला झालेल्या दुखापतीतून मी अजूनही सावरत आहे. पण या बातमीने मला हादरवून टाकले आहे.’
‘मला ही गोष्ट मान्य केली पाहिजे आणि आशा आहे की यामुळे आपल्या खेळ जगताला प्रेरणा मिळेल की भारतात आपण खेळाडूंनी कोणत्याही प्रकारचे औषध घेण्याबद्दल सतर्क राहिले पाहिजे आणि नियमांचे पालन केले पाहिजे.’
तसेच शॉने त्याला पाठींबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानताना म्हटले आहे की ‘मी बीसीसीआयचे आणि माझ्या जवळच्या व्यक्तींचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानतो.’
‘क्रिकेट माझे आयुष्य आहे आणि भारतासाठी आणि मुंबईसाठी खेळण्यापेक्षा दुसरा मोठा अभिमान माझ्यासाठी कोणताही नाही. मी यातून लवकरच आणि मजबूतीने बाहेर येईल. पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार.’
शॉ बरोबरच विदर्भाचा अक्षय दुल्लावर आणि राजस्थानचा दिव्य गजराज यांनाही डोपिंगच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.
— Prithvi Shaw (@PrithviShaw) July 30, 2019
"Cricket is my life & there is no bigger pride for me than playing for India & Mumbai and I will come out of this faster & stronger."https://t.co/490hWksGUd
— ICC (@ICC) July 30, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–तो खेळाडू ९ वर्षापूर्वी करत होता हे काम, आता ऍशेसमध्ये पदार्पण करण्यासाठी आहे सज्ज
–पहा व्हिडीओ- तेव्हा कपिलने ४ चेंडूत ४ षटकार ठोकून फॉलो-ऑन वाचवला होता!
–वाढदिवस विशेष- बर्थडे बाॅय जेम्स अँडरसनबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी






