रविवारी (२५ एप्रिल) आयपीएल २०२१ स्पर्धेत डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्याचा समारोप सुपर ओव्हरने झाला. दरम्यान पहिल्या डावात तुफान फटकेबाजी करत असलेल्या पृथ्वी शॉ हा कर्णधार रिषभ पंतच्या चुकीमुळे धावबाद झाल्यानंतर पृथ्वी शॉने संताप व्यक्त केला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात दिल्ली दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर १५९ धावा केल्या होत्या. यामध्ये सलामी फलंदाज पृथ्वी शॉने तुफान फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले होते. त्याने ३९ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५३ धावांची खेळी केली होती. परंतु रिषभ पंतच्या एका चुकीमुळे त्याला माघारी जावे लागले होते.
तर झाले असे की, १२ वे षटक टाकण्यासाठी जगदीशा सूचिथ गोलंदाजीला आला होता. याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर, पंत यष्टीचित होण्यापासून थोडक्यात बचावला. तो चेंडू यष्टिरक्षकाच्या हातून सुटला तेव्हा पंतला वाटले की तो चोरटी धाव घेऊ शकतो. त्यामुळे त्याने पृथ्वी शॉला एक धाव पळण्याचा इशारा केला होता. परंतु नंतर पंतने त्याला माघारी जाण्यास सांगितले आणि जोपर्यंत तो पोहचेल तितक्यात खलील अहमदने वेगाने गोलंदाजाच्या दिशेने चेंडू फेकला आणि तो धावबाद झाला.
चांगल्या लयमध्ये असलेला पृथ्वी शॉ धावबाद होऊन जेव्हा डगआऊट मध्ये जात होता तेव्हा त्याने हेल्मेट जमिनीवर फेकून रिषभ पंतवर संताप व्यक्त केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://twitter.com/lodulalit001/status/1386346658850430980?s=20
दिल्ली कॅपिटल्स संघाने केल्या होत्या १५९ धावा
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पृथ्वी शॉ याने ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तर कर्णधार रिषभ पंत याने ३७ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने २० षटक अखेर १५९ धावा केल्या होत्या.
हैदराबाद संघाने ही केल्या १५९ धावा
दिल्ली कॅपिटल्स संघाने दिलेल्या १६० धावांचा पाठलाग करताना हैदराबाद संघाकडून जॉनी बेअरस्टो याने तुफानी फटकेबाजी करत ३८ धावांची खेळी केली होती. तर केन विलियमसनने ६६ धावा केल्या होत्या.२० षटक अखेर हैदराबाद संघाला देखील १५९ धावा करण्यात यश आले होते.
सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने मारली बाजी
आयपीएल २०२१ स्पर्धेतील पहिला सुपर ओव्हर सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगला. हैदराबाद संघाकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी डेविड वॉर्नर आणि केन विलियमसन यांची जोडी मैदानात आली होती. या दोघांनी मिळून ७ धावा केल्या होत्या. तसेच दिल्ली संघाकडून फलंदाजी करण्यासाठी शिखर धवन आणि रिषभ पंत यांची जोडी मैदानात आली होती.शेवटच्या चेंडूवर १ धावाची आवश्यकता असताना, शिखर धवनने एक धाव काढत दिल्ली संघाला हा सामना जिंकवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘संघ सहकारी संजूला कर्णधार बनवल्याने खुश नाहीत वाटतं, म्हणून…’ माजी भारतीय क्रिकेटरने मांडले मत
सिराजला हलक्यात घेणाऱ्या जडेजाला वेगवान गोलंदाजाने ‘अशी’ दाखवली भिती, पाहा व्हिडिओ






